Join us

Lata Mangeshkar : साधं राहणीमान, मात्र आलिशान घरात राहत होत्या लता मंगशेकर; पाहा घराचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 5:43 PM

1 / 8
भारतरत्न लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारीला जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकूल झाले आहेत. त्यांच्या संपर्कात राहिलेल्यांना त्यांच्या भेटीचे क्षण आठवत आहेत. ते सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्याचवेळी जे त्यांना जवळून ओळखत नव्हते त्यांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. लता मंगेशकर यांचे राहणीमान साधे होते. पण त्या आलिशान घरात राहत होत्या. त्यांच्या घराचे फोटो पाहूयात.
2 / 8
लता मंगेशकर मुंबईतील पेडर रोड येथील प्रभू कुंज येथे राहत होत्या.
3 / 8
गायकाच्या घरातील प्रत्येक गोष्टीतून त्यांचा साधेपणा स्पष्टपणे दिसून येतो. अगदी सुरुवातीपासूनच धार्मिक वातावरणात वाढलेल्या लता मंगेशकर यांचे श्रीकृष्ण हे आवडते दैवत होते. घरात प्रवेश करताच त्याच्या डाव्या हाताला मंदिर आहे. जिथे भगवान श्रीकृष्णा यांच्यासोबत इतर देवही विराजमान आहेत.
4 / 8
लता मंगेशकर त्यांची दैनंदिन जीवनाची सुरुवात पूजेने होत असत.
5 / 8
दरवर्षी लता मंगेशकर त्यांच्या घरी गणेशजींचे आगमन होते. बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटींना त्या आपल्या घरी गणपती दर्शनासाठी बोलवायच्या. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा केला जात होता.
6 / 8
लता मंगेशकर यांच्या प्रभू कुंज येथील घराच्या ड्रॉईंग रूममध्ये लता मंगेशकर यांचे एक मोठे भिंत चित्र आहे आणि त्याच्या समोरील भिंतीवर त्यांच्या पालकांचे चित्र आहे.
7 / 8
घरातील पोद्दार रोडसमोरील बाल्कनी लता मंगेशकर यांची आवडती जागा होती. तिथे त्यांना नेहमी बसायला आवडत होते. याशिवाय गायनाच्या रियाजासाठी त्यांच्या घरात वेगळी खोली होती.
8 / 8
दोन दशकांपूर्वी, २००० साली, लता मंगेशकर यांचे घर प्रभू कुंज प्रसिद्धीच्या झोतात आले होते. जेव्हा सरकारने पोद्दार रोडमार्गे उड्डाणपूल बांधण्याची योजना आखली होती. लता मंगेशकर यांनी विरोध केला होता. त्यावेळी लता मंगेशकर यांनी उड्डाणपूल बांधला तर मुंबई सोडेन असेही म्हटले होते. त्यांच्या या विधानावरुन बराच वाद झाला होता. त्यानंतर वाढलेल्या किमती आणि सर्वसामान्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रद्द झाला.
टॅग्स :लता मंगेशकर