Join us

Lata Mangeshkar Radha Mangeshkar: भाची राधा मंगशेकर होती कुटुंबात लतादीदींच्या सर्वात जवळची; जाणून घ्या तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 5:28 PM

1 / 9
Lata Mangeshkar Radha Mangeshkar: भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांनी वयाच्या १३व्या वर्षापासून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. लता दीदींनी आपल्या भावंडांचा नीट सांभाळ केला आणि कुटुंबाला आधार दिला. पण लतादीदी कुटुंबात कोणाच्या सर्वात जवळच्या होत्या हे तुम्हाला माहीत आहे का?
2 / 9
लता मंगेशकर या त्यांची भाची राधा मंगेशकर हिच्या सर्वात जवळ होत्या असं म्हणतात. राधा मंगेशकर म्हणजे नक्की कोण आणि त्यांच्याबद्दलच्या काही माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया.
3 / 9
राधा मंगेशकर ही लतादीदींचा सर्वात लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची कन्या. राधा मंगेशकर ही एक प्रसिद्ध गायिका आहे.
4 / 9
राधा मंगेशकर हिने वडील हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडेच संगीताचे धडे गिरवले. आपल्या आत्याप्रमाणे राधा मंगेशकरलाही संगीत क्षेत्रात आपलं नावं मोठं करायचं असून त्यासाठी ती प्रयत्नशील असल्याचं अनेक मुलाखतीत सांगितलं आहे.
5 / 9
राधाने वयाच्या ७ व्या वर्षी संगीताच्या प्रवासाला सुरुवात केली. शिकताशिकता तिने वडील हृदयनाथ यांच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करण्यासही सुरुवात केली. राधा तिचे वडील हृदयनाथ यांच्यासोबत भाव सरगम ​​या मैफिलीत गात असे.
6 / 9
राधा वडिलांच्या मार्गदर्शनामुळेच स्टेजवर सोलो परफॉर्मर म्हणून उदयास आली. महाराष्ट्रासह देश-विदेशात तिने अनेक शो केले आहेत. आपल्याकडे जी शैली आहे त्या शैलीचा विचार करून प्रत्येकाने आपला मार्ग निवडावा असा विचार राधा मंगेशकर नेहमी मांडते.
7 / 9
२००९ मध्ये लता मंगेशकर यांच्या हस्ते भाची राधा मंगेशकर हिचा 'नाव माझे शामी' हा सोलो अल्बम लाँच करण्यात आला होता.
8 / 9
राधाने मराठी, हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तिचे अनेक अल्बमही रिलीज झाले आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राधा मंगेशकर या शास्त्रीय संगीतात पारंगत असून त्याच अभ्यासाच्या जोरावर तिने स्वतःची वेगळी ओळख व शैली निर्माण केली आहे.
9 / 9
शिक्षणाबद्दल बोलायचं झाल्यास, राधाने हिंदी आणि फिलोसॉफी विषयात पदवी घेतली आहे. तिने फिलोसॉफीमध्ये M.A देखील केलं आहे. (सर्व फोटो - राधा मंगेशकर फेसबुक)
टॅग्स :लता मंगेशकरहृदयनाथ मंगेशकरसंगीत