सुशांतच्या ‘दिल बेचारा’सह ओटीटीवर रिलीज होणार हे सात सिनेमे, एकदा पाहाच By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 5:06 PM1 / 7अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा येत्या दिवसांत ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा हॉरर कॉमेडी सिनेमा राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार इव्हेंटमध्ये या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा केली.2 / 7आलिया भट, आदित्य राय कपूर आणि संजय दत्त, पूजा भट यांची मुख्य भूमिका असलेला ‘सडक 2’ हा सिनेमाही ओटीटीवर प्रदर्शित होतोय. हा सिनेमा 1991साली रिलीज झालेल्या सडक या सिनेमाचा सीक्वल आहे. महेश भट यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.3 / 7भुज-द प्राईड आॅफ इंडिया हा एक वॉर सिनेमा आहे. 1971 च्या भारत-पाक युद्धावर बेतलेल्या या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमाही ओटीटीवर रिलीज होतोय.4 / 7दिल बेचारा हा सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा सिनेमा. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचा हा शेवटचा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज व्हावा, अशी चाहत्यांची इच्छा होती. पण आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज आहे.5 / 7लूटकेस यात कुणाल खेमू, रसिका दुग्गल, विजय राज मुख्य भूमिकेत आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा आहे. एक लाल रंगाची बेवारस सुटकेस कुणाल खेमूला सापडते. या सुटकेच्या मागे पोलिस, गुंडे, नेता सगळेच आहेत. या सुटकेससाठी काय काय होते, काय काय गोंधळ उडतो, त्याची ही कथा आहे.6 / 7कुकी कोहली दिग्दर्शित ‘द बिग बुल’ हा सिनेमा अजय देवगण व आनंद पंडित यांनी प्रोड्यूस केला आहे. अभिषेक बच्चन यात लीड रोलमध्ये आहे.7 / 7 खुदा हाफिज या सिनेमात विद्युत जामवाल लीड भूमिकेत आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा फारूक कबीर यांनी दिग्दर्शित केलेला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications