Join us

‘केजीएफ’ सुपरस्टार यशचे वडील आजही चालवतात बस, ‘मिलेनियल अँग्री यंग मॅन’चा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 1:38 PM

1 / 13
‘मिलेनियल अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखला जाणारा कन्नड सुपरस्टार यश याचा आज वाढदिवस.
2 / 13
आज यश त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करतोय. ‘केजीएफ’ या सिनेमामुळे यश चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आणि बघता बघता यशाच्या शिखरावर पोहोचला. एका बस ड्रायव्हरचा मुलगा असलेल्या यशचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
3 / 13
आज यश साऊथचा सुपरस्टार आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. पण यशचे वडील आजही बस चालवतात. कदाचित त्याचमुळे यशचे पाय आजही जमिनीवर आहेत.
4 / 13
यश मूळचा कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यातील एका छोट्या गावातला. त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा.
5 / 13
त्याचे वडील अरुण कुमार जे. कर्नाटक एसटी सेवेत ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि आई पुप्पलता गृहिणी आहे.
6 / 13
म्हैसूरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर यश बेंगळुरूला गेला आणि तिथे बी. व्ही. कारंथांनी स्थापन केलेल्या बेनाका या नाटक ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली.
7 / 13
पुढे छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने ‘नंदा गोकुळ’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या त्याच्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
8 / 13
छोट्या पडद्यानंतर वेळ होती ती, मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेण्याची. ‘जांबाडा हुडुगी’ या चित्रपटाद्वार ेयशची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली. पण त्याच्या वाट्याला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका आली. पण यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
9 / 13
आज दक्षिणेतील सुपरस्टारमध्ये त्याची गणना केली जाते. यशने त्याच्या 12 वर्षांच्या करियरमध्ये 18 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. यात केजीएफ हा सिनेमा मैलाचा दगड ठरला.
10 / 13
आज यश साऊथचा सगळ्यात महाग अभिनेता आहे. केजीएफच्या अभूतपूर्व यशानंतर सध्या तो एका प्रोजेक्टसाठी 15 कोटी रुपये घेतो.
11 / 13
‘जांबाडा हुडुगी’ या कन्नड चित्रपटाच्या सेटवरच यशला त्याची जन्माची जोडीदार राधिका पंडित भेटली आणि त्यांनी नंतर लग्न केले. यशला दोन मुलं आहेत.
12 / 13
यश आणि राधिकाने स्थापन केलेल्या यशो मार्ग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत 4 कोटी रुपयांची गुंतवणूक करून कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील तलावांची पुनर्बांधणी केली आहे.
13 / 13
यशचा ‘केजीएफ’ हा चित्रपट कन्नड भाषेतील 200 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला असून या वर्षी प्रदर्शित होणारा ‘केजीएफ 2’ त्याहून मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, असे मानले जातेय.
टॅग्स :यश