No Pregnency Plans: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी दिला आई होण्यास नकार; त्यांची कारण ऐकून व्हाल दंग By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 7:00 AM1 / 10छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पारुल चौहान. अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून पारुल लोकप्रिय झाली. पारुलला आई व्हायचं नसून एका मुलाखतीत तिने याविषयी भाष्य केलं होतं.2 / 10'मला मूल नकोय आणि मी निर्णयावर ठाम आहे. या विषय़ी माझे आणि माझ्या नवऱ्याचे सारखे विचार आहेत. मला लहान मुलं आवडतात पण ते दुसऱ्यांचे असतील तरच. माझ्या सासरच्या मंडळींनाही याविषयी कोणता आक्षेप नाही', असं पारुल म्हणाली.3 / 10कविता कौशक- 'एफआयआर' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली कविता कौशिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.4 / 10कविता आणि तिच्या पतीने मिळून मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला. तिच्या मते, 'मी वयाच्या ४० व्या वर्षी आई झाले तर माझ्या वयात माझं बाळ २० वर्षांचं असेल आणि त्याच्या तरुण वयात मला त्याच्यावर आमच्या म्हातारपणाचं ओझं लादायचं नाहीये', असं कविता म्हणाली होती. त्यामुळे तिने मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला.5 / 10आयशा जुल्का - बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आयशा जुल्काला देखील मूलबाळ नसल्याचं सांगण्यात येतं.6 / 10'मला मूल असावं असं मला कधीच वाटलं नाही. मी माझ्या कामात आणि सोशल लाइफमध्ये खूप गुंतलेली असते त्यामुळे मला मुलांचा विचार करणं जमलं नाही. आणि, माझा हा निर्णय माझ्या कुटुंबालाही मान्य आहे.'7 / 10रुबिना दिलैक - 'बिग बॉस १४'ची विजेती रुबिना दिलैकदेखील अद्याप आई झालेली नाही. आई-वडील होणं ही मोठी जबाबदारी असल्याचं एकदा रुबिनाने म्हटलं होतं.8 / 10'आई-वडील होणं ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्ही एकमेकांना समजून घेत नाही तोपर्यंत आम्ही अद्याप हा निर्णय घेतला नाही. एका नव्या जीवाला जन्म देणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते,' असं रुबिना म्हणाली.9 / 10विद्या बालन - बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन उत्तम अभिनयासह तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. विद्याने सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केलं आहे.10 / 10'सिद्धार्थ आणि विद्या यांच्या लग्नाचा बरीच वर्ष उलटली आहेत. मात्र, त्यांनी अद्याप पालक होण्याचा निर्णय घेतलेला नाही. माझ्याकडे मुलांसाठी वेळ नाही. माझा प्रत्येक चित्रपटच माझं नवं बाळ असतं. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर मी २० मुलांची आई आहे', असं विद्या म्हणाली. आणखी वाचा Subscribe to Notifications