Lock Upp: करिअर जोमात चालावं म्हणून काळी जादू करत होती Payal Rohatagi; म्हणाली, "अनेकांवर केले प्रयोग..." By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 7:30 PM1 / 8कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) लॉकअप (Lock Upp) शो मध्ये सेलिब्रिटींचं निराळं रुप पाहायला मिळत असेल ज्याची चाहत्यांनी कल्पनाही केली नसेल. सेलेब्स एकापाठोपाठ एक मोठे खुलासे करत आहेत. एका एपिसोडमध्ये शो मधील कैदी पायल रोहतगीने तिच्या आयुष्यातील एक सत्य जगासमोर ठेवलं आहे. ते ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.2 / 8आपलं करिअर जोमात चालण्यासाठी ती वशीकरण काळी जादू करायची, असं तिनं शोदरम्यान सांगितलं. 'मी या क्षेत्रात १५ वर्षांपासून आहे आणि एक काळ असा होता की माझे करिअर चांगले चालत नव्हते. माझं करिअर जोमात चालण्यासाठी मी काळी जादूही केली,' असं पायल म्हणाली.3 / 8'आपलं करिअर पुढे नेण्यासाठी काळी जादू करावी असं कोणतीही शिक्षित महिला किंवा प्रोफेनल असा विचार करू शकत नाही असं मला वाटतं. जर असं तुम्हाला करायचं असेल तरी सर्वांपासून लपवून करावं लागतं,' असंही तिनं यावेळी सांगितलं.4 / 8'हे एकप्रकारचं वशीकरण होतं आणि जे मी केलंय. दिल्लीत एक बाबा होता, त्यानं मला अशा व्यक्तीबाबत विचार कर किंवा अशा व्यक्तीच्या गोष्टी आण ज्याला तुला कंट्रोल करायचं आहे असं सागितलं. अशा मी अनेक गोष्टी केल्या. पण यापैकी काहीही माझ्या कामी आलं नाही,' असंही पायल म्हणाली.5 / 8जर मी माझ्या करिअरसाठी असं काही केलंय आणि तरीी काहीही झालं नाही हे सांगितलं असतं तर लोकांनी माझी खिल्ली उडवली असती. हे एक सिक्रेट होतं, मला वाटत नाही कोणतीही प्रोफेशनल व्यक्ती आपल्या करिअरला पुढे नेण्यासाठी अशा प्रकारचा मार्ग अवलंबेल, असंही तिनं पुढे सांगितलं.6 / 8पायल रोहतगीच्या या गौप्यस्फोटानंतर लॉक अप होस्ट कंगना रणौत हीनं मजेत तिला विचारलं, 'जे तू केलं ते काळी जादू होती का. तू काळी जादू करून लोकांना वश करण्याचा प्रयत्न केला.'7 / 8'मला असं वाटतं की तू सुंदर आणि प्रतिभावान आहे, तुला या गोष्टींची गरज नाही. तू अशा लोकांचं वशीकरण करू शकतेस. मी जेव्हा या क्षेत्रात आले होते, तेव्हा ही मुलगी काळी जादू करते असं म्हटलं जायचं. जेव्हा एखादी मुलगी यशस्वी होते तेव्हा तिच्या क्षमतेवर शंका उपस्थित केली जाते,' असं कंगना यावेळी म्हणाली.8 / 8'आपल्या धर्मात हे सर्व करण्याची परवानगी आहे,' असं पायल म्हणाली. यावर कंगनानं उत्तर देत हे हिंदुज्मची ब्रँड एम्बेसेडर बनून फिरतेस ते बंद कर असं सांगत आपल्या धर्मात असं काही नसल्याचं म्हटलं. आणखी वाचा Subscribe to Notifications