सेटवर फुललं प्रेम, हॉटेलच्या बाल्कनीत केलं प्रपोझ, खूप फिल्मी आहे ऐश्वर्या-अभिषेकची लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:44 IST
1 / 8अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांची लव्हस्टोरीदेखील फिल्मी आहे.2 / 8मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्या रायने जेव्हा चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली तेव्हा तिचे निळे डोळे आणि सौंदर्य पाहून सगळेच घायाळ झाले. असेच काहीसे अभिषेकच्या बाबतीत घडले. 3 / 8खरेतर दोघेही पहिल्यांदाच ‘ढाई अक्षर प्रेम से’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. इथून दोघांची मैत्रीही झाली. मग हळूहळू अभिषेक त्या सुंदर सौंदर्याच्या प्रेमात पडला. तेव्हा अभिनेता ऐश्वर्याला काहीही बोलला नाही.4 / 8त्यानंतर ते दोघे २००३ मध्ये आलेल्या 'कुछ ना कहो'मध्ये दिसले त्यानंतर त्यांनी २००६ मध्ये 'उमराव जान' आणि त्यानंतर 'धूम २'मध्ये काम केले. तोपर्यंत अभिषेकने ठरवले होते की, तो ऐश्वर्यासोबत आयुष्य व्यतित करायचे. 5 / 8यानंतर अभिनेत्याने ऐश्वर्याला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिषेकने एका हॉटेलच्या बाल्कनीत ऐश्वर्याला प्रपोज केले होते आणि अभिनेत्रीनेही लगेच होकार दिला होता.6 / 8खुद्द अभिषेकने ओपरा विन्फ्रेच्या शोमध्ये याचा खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी त्याच बाल्कनीत ऐश्वर्यासोबत लग्न करण्याचा विचार करत होतो. म्हणून मी तिला तिथेच प्रपोज केलं. 7 / 8यानंतर २० एप्रिल २००७ रोजी ऐश्वर्या आणि अभिषेकचे मुंबईत मोठ्या थाटामाटात लग्न झाले. त्यांच्या लग्नाला अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 8 / 8लग्नानंतर हे स्टार कपल मुलगी आराध्याचे पालक झाले. जी आता १३ वर्षांची आहे आणि ती खूप चर्चेत असते.