'या' एका अटीवर झालं होतं श्रीदेवींचं बोनी कपूरसोबत लग्न; चुकवावी लागली होती मोठी किंमत By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 11:43 AM 2021-11-11T11:43:57+5:30 2021-11-11T11:52:57+5:30
boney kapoor: 'मिस्टर इंडिया' चित्रपटात श्रीदेवी, अभिनेता अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार होत्या. परंतु, त्यासाठी श्रीदेवींच्या आईने एक मोठी अट समोर ठेवली होती. बॉलिवूड सेलिब्रिटी कायमच त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतात. अनेकदा या कलाकारांच्या वैवाहिक जीवन, लव्ह, अफेअर याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगते. सध्या अशीच चर्चा निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याविषयी रंगली आहे.
लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन होऊन आज बराच काळ लोटला आहे. परंतु, आजही चाहत्यांमध्ये त्यांच्या चर्चा रंगतात. यात सध्या त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगली आहे.
१९९६ मध्ये बोनी कपूर यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन श्रीदेवी यांच्यासोबत लग्न केलं. परंतु, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.
बोनी कपूर यांनी जरी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला असला तरीदेखील श्रीदेवींसोबत लग्न करण्यासाठी त्यांना त्यांच्या सासूबाईंची एक अट मान्य करावी लागली होती.
'सोलहवा सावन' या चित्रपटाच्या सेटवर बोनी कपूर यांनी पहिल्यांदा श्रीदेवी यांना पाहिलं होतं. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत बोनी कपूर त्यांच्या प्रेमात पडले होते.
बोनी कपूर जरी श्रीदेवींच्या प्रेमात पडले असले तरीदेखील श्रीदेवींनी मात्र त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यांमुळे बोनी कपूर यांनी श्रीदेवींना त्यांच्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटात कास्ट करायचा निर्णय घेतला.
'मिस्टर इंडिया' चित्रपटात श्रीदेवी, अभिनेता अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार होत्या. परंतु, त्यासाठी श्रीदेवींच्या आईने एक मोठी अट समोर ठेवली होती. याविषयी खुद्द बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता.
श्रीदेवींना जर मिस्टर इंडियामध्ये कास्ट करायचं असेल तर त्यासाठी १० लाख रुपये मानधन द्यावं लागेल असं त्यांच्या आईने सांगितलं. त्याकाळी श्रीदेवींच्या मानधनाचं सारं काही त्यांच्या आई पाहायच्या.
विशेष म्हणजे श्रीदेवीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बोनी कपूर यांनी १० लाख रुपये मानधन देण्याची अट मान्य केली. इतकंच नाही तर त्यांनी श्रीदेवीच्या आईला इंप्रेस करण्यासाठी १० ऐवजी ११ लाख रुपये मानधन दिलं.
दरम्यान, या चित्रपटानंतर श्रीदेवी व बोनी कपूर यांची जवळीक वाढल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर १९९६ मध्ये या दोघांनी लग्न केलं.