Love Story: शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, केला विवाह, अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 5:43 PM1 / 6सिनेजगतातील कलाकारांच्या चित्रपटातील केमेस्ट्रीला चाहते जेवढं पसंत करतात तेवढीत त्यांच्या रियल लाईफमधील केमेस्ट्री आणि रोमान्सवरही चाहत्यांचं लक्ष असतं. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया जे शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांसोबत लग्नही केले. 2 / 6क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनिष्का शर्मा पहिल्यांदा एका जाहिरातीमध्ये एकत्र आले होते. त्यानंतर ते प्रेमात पडले. नंतर त्यांनी विवाह केला. आता त्यांना वामिका नावाची एक मुलगी आहे. 3 / 6बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर हे अलोन चित्रपटामध्ये पहिल्यांदा भेटले होते. तिथूनच त्यांच्या प्रेमप्रकरणास सुरुवात झाली. अखेरीस २०१६ मध्ये त्यांनी विवाह केला. 4 / 6दीपिका पादुकोण आणि रणवीस सिंह हे राम लीला चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अनेक रिपोर्ट्सनुसार चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान, त्यांच्या प्रेमप्रकरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी विवाह केला होता. 5 / 6सैफ अली खान आणि करिना कपूरची प्रेमकहाणी खूप चर्चित आहे. त्यांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना आता दोन मुलगे आहेत. २००८ मध्ये आलेल्या टशन चित्रपटापासून त्यांच्या प्रेमप्रकरणास सुरुवात झाली होती. 6 / 6आलिया भट्ट नेहमी सांगायची की रणबीर कपूर तिचा क्रश आहे. तसेच त्याच्याशी विवाह करण्याची तिची इच्छा आहे. दरम्यान, ब्रह्मास्त्रच्या शूटिंगदरम्यान, ते एकत्र आले. आता दोघांचही लग्न झालंय. तसेच आता आलिया प्रेग्नंट आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications