Join us
Daily Top 2Weekly Top 5

5 मुलांचा पिता आहे लकी अली; 3 वेळा मोडला संसार आज जगतोय एकाकी जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 14:37 IST

1 / 11
लकी अली(Lucky Ali) हे नाव आज कोणालाही नवीन नाही. आपल्या आवाजाने त्याने अनेकांना मंत्रमुग्ध केलं.
2 / 11
एक पल का जीना, क्यों चलती हैं पवन, ना तुम जानो ना हम यांसारखी त्याची असंख्य गाणी हिट झाली.
3 / 11
लकी अलीने करिअरमध्ये जितकं यश पाहिलं त्याच्या कैकपटीने त्याला खऱ्या आयुष्यात खासकरुन वैवाहिक आयुष्यात अपयशाचा सामना करावा लागला.
4 / 11
लकी अलीचं खरं नाव मकसूद मोहम्मद अली असं असून आज त्याने बॉलिवूडमध्ये त्याच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.
5 / 11
लकी अलीच्या आयुष्यात बरीच वादळं आली. यात त्याने खऱ्या आयुष्यात तीन वेळा संसार थाटला मात्र त्याचं एकही लग्न टिकलं नाही. अखेर आज तो एकाकी जीवन जगत आहे.
6 / 11
लकी अलीने पहिलं लग्न अभिनेत्री मेघन जेन मॅकक्लेरी हिच्यासोबत लग्न केलं. मेघनने लकीच्या सुनो या पहिल्या अल्बममध्ये काम केलं होतं.
7 / 11
मेघन आणि लकी यांनी १९९६ मध्ये लग्न केलं. या दोघांना दोन मुलंसुद्धा आहेत. परंतु, काही कारणामुळे ही जोडी विभक्त झाली.
8 / 11
मेघनपासून विभक्त झाल्यानंतर ४ वर्षांमध्येच त्याने अनाहिता या पर्शियन महिलेसोबत संसार थाटला. लकीसाठी तिने तिचा धर्म बदलून इस्माल धर्म स्वीकारला. विशेष म्हणजे अनाहिता आणि लकी यांनाही दोन मुलं आहेत.
9 / 11
अनाहितासोबतही लकीचं नात फार काळ टिकलं नाही. त्याने दुसरा संसारही मोडला. त्यानंतर त्याने ब्रिटीश मॉडेल केट एलिझाबेथ हिच्याशी लग्न केलं, केट, लकीपेक्षा जवळपास २५ वर्षांनी लहान होती. परंतु, त्याचं हे तिसरं लग्नही मोडलं.
10 / 11
२०१७ मध्ये केट आणि लकी अली वेगळे झाले त्यांना एक मुलगादेखील आहे. विशेष म्हणजे तीन वेळा संसार मोडल्यानंतर लकी अली आज एकटाच जीवन जगत आहे.
11 / 11
लकी अलीने गायक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात 'दुश्मन दुनिया का' या चित्रपटाच्या गाण्याने केली.
टॅग्स :लकी अलीसेलिब्रिटीबॉलिवूडहृतिक रोशन