‘प्रेमग्रंथ’मध्ये माधुरीसोबत काम करणारी चिमुकली आता दिसते अशी? फोटो पाहून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 4:26 PM1 / 11माधुरी दीक्षित व ऋषी कपूर यांच्या ‘प्रेमग्रंथ’ या गाजलेल्या सिनेमाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली. या सिनेमात अनेक कलाकार होते़ जे काळासोबत बरेच बदलले आहे. या सिनेमात एक बालकलाकारही होती. ती सध्या कुठेय, कशी दिसते, काय करतेय?2 / 11‘प्रेमग्रंथ’मध्ये दिसलेल्या या चिमुकलीचे नाव सलोनी चोप्रा आहे. ही चिमुकली आता बरीच ग्लॅमरस व बोल्ड झालीये.3 / 11अद्याप सलोनी अॅक्टिंग क्षेत्रात आहे आणि सतत बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.4 / 11‘प्रेमग्रंथ’ला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माधुरीने कालपरवा सलोनीसोबतचा एक फोटो शेअर केला होता.5 / 11हा जुना फोटो पाहून सलोनी जुन्या आठवणीत रमली. तिने माधुरीने शेअर केला फोटो जशाच्या तशा इन्स्टावर शेअर केला.6 / 11तुझी मुलगी आत्ताही तितकीच क्यूट आहे की नाही? असे कॅप्शन तिने माधुरीला उद्देशून लिहिले.7 / 11‘प्रेमग्रंथ’च्या सेटवरच्या अनेक आठवणीही यानिमित्ताने सलोनीने शेअर केल्यात.8 / 11तिने सांगितले, मी माधुरी मॅमला पहिल्यांदा भेटले तेव्हा अगदीच लहान होते. हाय माझे पहिले नाव टीना आहे आणि दुसरे सलोनी, अशी ओळख मी त्यांना करून दिली होती. कारण घरी मला टीना या नावानेच बोलवत होते. यावरून माधुरी मॅम सेटवर माझी मस्करी करायच्या.9 / 11माधुरी सतत माझ्याजवळ यायची आणि तुझे नाव काय? असा एकच प्रश्न विचारायची. मी टीना म्हणल्यावर दुसरे नाव काय? असे हसून विचारायची, असेही सलोनीने सांगितले होते.10 / 11‘प्रेमग्रंथ’ या सिनेमात काम केले तेव्हा सलोनी 6 वर्षांची होती. आता ती 30 वर्षांची आहे. सलोनी एक मॉडेल आहे. मध्यंतरी दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे ती चर्चेत आली होती.11 / 112018 मध्ये सलोनी रेस 3 या सिनेमात झळकली होती. रणदीप हुड्डाची स्टायलिस्ट म्हणूनही तिने काम केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications