Madhuri Dixit : पती आणि दोन मुलांसोबत आलिशान घरात राहते धकधक गर्ल माधुरी दीक्षित, जाणून घ्या तिच्या संपत्तीचा आकडा By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 1:49 PM1 / 11बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे माधुरी दीक्षितने दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे. (Photo Instagram)2 / 11सोशल मीडियावरही माधुरीची फॅन फॉलोइंग प्रचंड मोठी आहे.फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते.(Photo Instagram)3 / 11आज माधुरी दीक्षित आलिशान आयुष्य जीवन जगते आणि यामागे तिची मेहनत स्पष्टपणे दिसून येते.(Photo Instagram)4 / 11माधुरी दीक्षितची कमाई चांगली आहे. ती चित्रपट, ब्रँड प्रमोशन, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर कमाई करते. (Photo Instagram)5 / 11 माधुरी एका सिनेमात काम करण्यासाठी जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचं मानधन घेते. (Photo Instagram)6 / 11माधुरीचे मुंबई व अमेरिका या दोन्ही ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तसेच तिच्याकडे रेसिडेन्शिएल अपार्टमेंट व कमर्शिएल प्रॉपर्टी आहे. (Photo Instagram)7 / 11माधुरी दीक्षितच्या घराबद्दल बोलायचे झाले तर, ती पती श्रीराम माधव नेने, मुले अरिन आणि रेयान यांच्यासोबत मुंबईतील पलटियाल येथील तिच्या आलिशान बंगल्यात राहते. या बंगल्यात सर्व सुखसोयी आहेत.(Photo Instagram)8 / 11इतर सेलिब्रिटींप्रमाणेच माधुरी दीक्षितलाही लक्झरी आणि महागड्या कारची आवड आहे. तिच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे रोल्स रॉयस, ऑडी, स्कोडा रॅपिड आणि इनोव्हा क्रिस्टासारख्या अनेक कार आहेत. (Photo Instagram)9 / 11एक रिअलिटी शो जज करण्यासाठी माधुरी 25 कोटी रूपये घेते.याशिवाय एंडोर्समेंटचे वेगळे चार्जेस घेते. चित्रपटांशिवाय जाहिरातीतूनही मानधन मिळते. (Photo Instagram)10 / 11माधुरी दीक्षित ही करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरीकडे 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. (Photo Instagram)11 / 11माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications