Join us

माधुरी, मुंबई अन् वडापाव; अमेरिकेच्या बड्या हस्तीनेही मारला प्लेटवर ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:26 PM

1 / 9
मुंबई आणि वडापावचं एक वेगळंच नातं आहे. मुंबईत गेलेल्या माणसांच्या स्वागतला स्वस्तात मस्त असा वडापाव सदैव तैय्यार असतो.
2 / 9
गरिबांची भूक जाणणारा आणि गरिबांच्या खिशाला परवडणारा वडापाव अनेकांच्या संघर्ष काळातील साथी आहे. त्यामुळेच, मोठमोठे सेलिब्रिटी, उद्योजक व क्रिकेटर्सही कधी कधी आवर्जुन वडापावर वर ताव मारताना दिसतात.
3 / 9
धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही वडापाव वर ताव मारला आहे. विशेष म्हणजे एका बड्या व्यक्तीसोबत तिने वडापावची चव चाखलीय. त्या व्यक्तीलाही वडापाव जाम आवडलाय.
4 / 9
जगविख्यात मोबाईल कंपनी असलेल्या Apple कंपनीला देशात 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे कंपनीचे मुंबईत स्टोअर सुरू केले जात आहे. जगातील एक प्रतिष्ठित ब्रँडचे स्टोअर उघडत असत्याने तेथील पहिले ग्राहक बनण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
5 / 9
Appl चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक आयफोन कंपनीच्या भारतातील या पहिल्या स्टोअरचे उद्धाटन करणार आहेत. मंगळवारी BKC बिझनेस डिस्ट्रिक्ट येथे हे स्टोर सुरू होणार आहे. त्यासाठी सध्या स्वत: टीम कुक सध्या मुंबईत दाखल झाले आहेत.
6 / 9
टीम कुक यांनी स्टोअरच उद्धाटन करण्यापूर्वी तेथील टीमची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईचा फेरफटका मारत प्रसिद्ध मुंबई वडापाववर देखील ताव मारला. विशेष म्हणजे कुक यांना वडापावची मेजवाणी देणारी सेलिब्रिटी चक्क माधुरी दीक्षित होती.
7 / 9
माधुरी दीक्षितने स्वत: या भेटीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. तसेच, मुंबईत वडापावपेक्षा भारी स्वागत दुसरं कशानेच होत नाही, असे म्हणत माधुरीने फोटो शेअर केलाय.
8 / 9
माधुरीच्या ट्विटला रिप्लाय देत, माझ्या पहिल्या वडापावच्या ट्रीटसाठी धन्यवाद माधुरी दीक्षित, चव उत्तम होती. असे टीम कुक यांनी म्हटलंय. सध्या सोशल मीडियावर या जोडीचा आणि वडापाव खातानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
9 / 9
चाहत्यांनी अक्षरश: कमेंट करुन माधुरीचं कौतुक केलंय. तसेच, माधुरीने चक्क कुकला वडापाव खाऊ घातलाय, असेही अनेकांनी म्हटलंय. या फोटोवर अनेक मजेशीर आणि मुंबईची खाद्यसंस्कृती जपल्याच्याही कमेंट युजर्संने केल्या आहेत.
टॅग्स :माधुरी दिक्षितअ‍ॅपल आयफोन Xमुंबईबॉलिवूड