महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे नाशिकशी ऋुणानुबंध By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 8:27 PM1 / 4दिलीपकुमार हे देवळाली कॅम्पच्या बार्न्स स्कुलचे विद्यार्थीही होते. तसेच येथील मुसा कॉटेजमध्ये त्यांनी अक्षरओळखीचे (बालवाडी) धडे गिरविले होते. येथूनच दिलीपकुमार यांनी तारुण्यात पुणे गाठले होते. 2 / 4दिलीपकुमार आपल्या आईच्या बरसीच्या (वर्षश्राध्द) तारखेला देवळाली कॅम्प येथील कब्रस्तानात पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांच्यासह हजेरी लावत असे. सुमारे पंधरा ते वीस वर्षांपुर्वी ते येथील कब्रस्तानात आपल्या आई-वडिलांच्या कबरींवर पुष्पांची चादर अर्पण करण्यासाठी आले होते. त्यावेळी नाशिक लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी त्यांची छायाचित्रे टिपली होती. 3 / 4त्यांचे वडील गुलाम सरवर खान हे त्यावेळेचे नाशिकचे प्रसिध्द फळ बागायतदार होते. त्यांच्याकडून देवळाली कॅम्प येथील भारतीय सैन्यदलाच्या आर्टीलरी सेंटरमध्ये फळांचा पुरवठाही केला जात असे. त्यांचे येथे मोठे घरदेखील होते. 4 / 4सुपरस्टार दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तावर संपूर्ण देशासह इगतपुरी तालुक्यातील चिञीत झालेल्या 'गंगा जमुना' या सुपरहीट चित्रपटातील सलग तीन वर्ष चिञीकरण चाललेल्या नांदूरवैद्य येथील ज्या ब्रिटिशकालीन रोकडे वाड्यात संपूर्ण चिञपट चिञीत केला गेला या आठवणींना उजाळा देत त्या रोकडे वाड्याचे मालक राजाभाऊ रोकडे यांच्यासह त्या काळातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या वतीने अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आणखी वाचा Subscribe to Notifications