1 / 9साऊथ स्टार नागार्जुन विवाहित असताना आमलाच्या प्रेमात पडला. आमलासाठी नागार्जुनने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. नंतर अमला व नागार्जुनचे लग्न झाले.2 / 9तामिळचा सुपरस्टार अजित कुमार ‘अमार कलम’च्या शूटींगदरम्यान त्याची को-स्टार शालिनीच्या प्रेमात पडला. यानंतर वर्षभरातच दोघांनी लग्न केले.3 / 9अभिनेते प्रकाश राज पोनी वर्मा या कोरिओग्राफरसोबत काम करता करता तिच्या प्रेमात पडले. यानंतर त्यांनी पोनी वर्मासोबत लग्नही केले.4 / 9तामिळ सुपरस्टार सूर्या व ज्योतिका यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले. यादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2006 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.5 / 9महेश बाबू व नम्रता शिरोडकर टॉलिवूडचे सर्वात क्यूट कपल आहे. ‘वामसी’ या सिनेमात काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनी लग्नही केले.6 / 9‘केजीएफ’ फेम यश शूटींगदरम्यान त्याची को-स्टार राधिका पंडितच्या प्रेमात पडला. टीव्ही सीरिअल्सपासून दोघांनी करिअरला सुरुवात केली होती. नंतर दोघांनीही लग्न केले.7 / 9नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व अभिनेत्री सामंथा अक्किनेनी ‘माया चेसवा’ या सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघेही लग्नबेडीत अडकले.8 / 9नयनतारा व प्रभुदेवा हेही शूटींग करता करता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र यांचे प्रेम अधुरे राहिले. कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले.9 / 9कधीकाळी प्रभुदेवाच्या प्रेमात असलेली नयनतारा सध्या विग्नेश शिवनच्या प्रेमात वेडी झाली आहे. नानुम राऊडी या सिनेमाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लवकरच हे कपल लग्न करणार आहे.