Join us

ड्रग्ज प्रकरणात नम्रता शिरोडकरचे नाव येताच बिथरले महेशबाबूचे फॅन्स, असे झालेत रिअ‍ॅक्ट

By रूपाली मुधोळकर | Published: September 22, 2020 2:08 PM

1 / 10
बॉलिवूडची पूर्वाश्रमीची अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिचे नाव सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतेय. कारण काय तर ड्रग्ज प्रकरणात तिच्या नावाचा झालेला उल्लेख.
2 / 10
नम्रता शिरोडकर ही साऊथचा सुपरस्टार महेशबाबूची पत्नी आहे. ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव येताच, महेशबाबूच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
3 / 10
महेशबाबूचे फॅन्स या वृत्तावर वेगवेगळ्याप्रकारे रिअ‍ॅक्ट होत आहेत.
4 / 10
तुझ्या पत्नीचे नाव ड्रग्ज प्रकरणात आले आहे, तू यावर काय बोलशील, असे एका युजरने लिहिले आहे. तर अन्य एका युजरने, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
5 / 10
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबी याप्रकरणी अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.
6 / 10
‘आजतक’च्या वृत्तानुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K हा कोडवर्ड समोर आला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये या नावांचा उलगडा झाला आहे. त्यानुसार D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा ही नावं समोर आली आहेत.
7 / 10
सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर जया साहा हिच्या KWAN या कंपनीची मॅनेजर करिश्माचे काही व्हॉट्स अ‍ॅप चॅट एनसीबीच्या हाती लागली आहेत़ यात एक नाव नम्रता शिरोडकर हिचेही आहे.
8 / 10
काही व्हाट्सअ‍ॅप चॅटमध्ये D N S K या इंग्रजी आद्याक्षरांचा कोडवर्ड म्हणून वापर केला गेला आहे. D याचा अर्थ दीपिका पादुकोण आणि Nयाचा अर्थ नम्रता शिरोडकर.
9 / 10
रिपोर्टनुसार, एन नावाची अभिनेत्री जे अर्थात जया साह. हिच्याकडे एमडी या ड्रग्जची डिमांड केली होती. व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून याचा खुलासा झाला आहे.
10 / 10
या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये एन नामक अभिनेत्री लिहिते, ‘मुंबईत तू मला एमडी देशील, असे प्रॉमिस तू केले होते. मी पुन्हा आले की,आपण सोबत पार्टी करू. मला खरोखर ब्रेकची गरज आहे.’ यावर जे म्हणजेच जया साहा लिहिते, ‘तू मला ड्रग्ज पॅडलर बनवते आहेस. पण तरीही तुझी इच्छा माझ्यासाठी आदेश आहे.’
टॅग्स :नम्रता शिरोडकरमहेश बाबू