PHOTOS : ‘दे धक्का 2’मध्ये दिसणार महेश मांजरेकरांची लेक, आहे फारच सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:38 PM1 / 9संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा सिनेमा म्हणजे, ‘दे धक्का’. आता या धम्माल कॉमेडीचा दुसरा डोस अर्थात ‘दे धक्का 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकरांच्या लेकीचीही वर्णी लागली आहे.2 / 9होय, महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकर या ‘दे धक्का 2’ आहेत. शिवाय मांजरेकरांची तिसरी लेक सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.3 / 9आम्ही बोलतोय ते गौरी इंगवले हिच्याबद्दल. ‘दे धक्का 2’मध्ये तिच्यासोबत मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सक्षम कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव असे सगळे आहेत.4 / 9 महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर या दोघांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक लेक आहे. तिचं नाव आहे गौरी इंगवले.5 / 9 गौरीसुद्धा अभिनेत्री आहे. नुकताच तिचा ‘पांघरूण’ हा चित्रपट रिलीज झाला होता. गौरी इंगवले ही मेधा मांजरेकर यांच्या पहिल्या नवºयाची लेक आहे. 6 / 9गौरीनं बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘कुटुंब’ या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.7 / 9 ओवी या नाटकात तिने मुख्य भूमिका साकारली होती. या नाटकाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. गौरीनं यात अभिनेत्री हेमांगी कवीसोबत स्क्रीन शेअर केली होती.8 / 9गौरी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनाही आहे. तिने भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं आहे.9 / 9गौरी ही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ती सतत स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications