Join us

Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 5:35 PM

1 / 10
अभिनेत्री माही विजने 2019 मध्ये IVF तंत्रज्ञानाद्वारे मुलगी ताराला जन्म दिला. आज मदर्स डेच्या निमित्ताने तिने लेकीच्या जन्माच्या वेळीचा अनमोल क्षण आठवला आणि ती भावूक झाली.
2 / 10
माहीने लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 'तारा, आज मदर्स डे, आणि मला तो पहिली क्षण आठवतो जेव्हा मी तुला पहिल्यांदा माझ्या कुशीत घेतलं होतं.'
3 / 10
'ज्या दिवशी मला पहिल्यांदा एक स्त्री, आई झाल्यासारखं वाटलं. तू एक ब्लेस्ड बेबी आहेस, माझ्या बाळा, तू सर्वत्र प्रेम पसरवत आहेस.'
4 / 10
'जसजशी तू पुढे जातेस तसतशी मी ठीक होते. मला शब्दांत ती भावना मांडता येणार नाही अशा प्रकारे तू मला आनंद देतेस. तू जादू आहेस.'
5 / 10
'तू NICU मध्ये असताना मला माहीत होतं की, माझी मुलगी धाडसी आणि स्पेशल आहे. आज जेव्हा मला तो दिवस आठवतो तेव्हा मला आठवतं की तुझ्या चारही बाजुला ट्यूब होत्या.'
6 / 10
'माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण मी स्वतःला रडण्यापासून थांबवले. मी स्वत: ला सांगितलं की, तू मिळाल्यामुळे मी धन्य झाली आहे आणि मी दररोज हा आनंद साजरा करत आहे' असं माहीने म्हटलं आहे.
7 / 10
माहीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तारा ही प्रीमॅच्युअर बेबी आहे आणि तिचा जन्म आयव्हीएफ तंत्रज्ञानाने झाला आहे. अत्यंत अवघड परिस्थितीत तिचा जीव वाचला आहे.
8 / 10
ताराला महिनाभर माही कुशीत घेऊ शकली नाही. ती व्हेंटिलेटरवर होती. माही विज आणि जय भानुशाली यांना अनेक वर्षांनी मुलगी झाली. लेकीच्या जन्मानंतर आता ते खूप आनंदी आहेत.
9 / 10
10 / 10
टॅग्स :जय भानुशाली