Join us

आधी टेनिसपटूच्या प्रेमात, ब्रेकअप झाल्यावर भावाच्या मित्रासोबत गुपचूप लग्न, आता वयाच्या पन्नाशीत जगतेय एकाकी जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 9:55 AM

1 / 8
क्रिकेट आणि बॉलीवूडचं नातं जगजाहीर आहे. अनुष्का शर्मा, हेजल कीच, सागरिका घाटगे यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी जीवनसाथी म्हणून क्रिकेटपटूंची निवड केली. क्रिकेटप्रमाणेच टेनिस आणि बॉलीवूडचं नातंही तितकंच जवळचं राहिलं आहे. भारताचे दोन दिग्गज टेनिसपटू महेश भूपती आणि लियांडर पेस हेसुद्धा बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडले होते. महेश भूपतीने लारा दत्ता हिच्यासोबत विवाह केला. तर लियांडर पेसचं नावही अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. त्यातील एक बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. मात्र पेससोबत झालेलं ब्रेकअप आणि नंतर वैवाहिक जीवनात आलेल्या अपयशानंतर आता ती एकाकी जीवन जगत आहे.
2 / 8
२००० च्या दशकात लियांडर पेसचं नाव या अभिनेत्रीशी जोडलं गेलं होतं. त्या काळाता या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं होतं. तसेच जेव्हा लियांडर पेस टेनिस सामने खेळायचा तेव्हा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही अभिनेत्री तिथे उपस्थित असायची.
3 / 8
या अभिनेत्रीचं नाव आहे महिमा चौधरी. महिमा चौधरी आणि लियांडर पेस यांच्या नात्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये खूप काही बोललं आणि लिहिलं गेलं आहे. या जोडप्याने सुमारे तीन वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केले. महिमा लियांडरच्या प्रेमात एवढी गुंतली होती की तिने तिच्या करिअरकडेही दुर्लक्ष केलं होतं.
4 / 8
महिमा चौधरी हिने लियांडर पेससोबत विवाह करून संसार थाटण्याचं स्वप्न रंगवलं होतं. मात्र अचानक तिला असं काही समजलं की, ज्यामुळे तिच्या पायाखालची वाळूच सरकली. महिमासोबत नात्यात असताना लियांडर पेसने संजय दत्तची पूर्वाश्रमीची पत्नी रिया पिल्ले हिला डेट करण्यासा सुरुवात केली होती.
5 / 8
लियांडर पेसकडून प्रेमात झालेल्या फसवणुकीमुळे महिमा चौधरी हिला मोठा धक्का बसला होता. या ब्रेकअपचा फटका तिच्या करिअरवरही झाला होता. त्यानंतर पुढची काही वर्षे तिने करिअरवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता.
6 / 8
पुढे काही वर्ष सिंगल राहिल्यानंतर २००६ मध्ये महिमा चौधरीने तिच्या विवाहाची बातमी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तिने लास वेगासमधील एका हॉटेलमध्ये बॉबी मुखर्जी नावाच्या एका व्यक्तीशी विवाह केला होता.
7 / 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार बॉबी मुखर्जी कोलकाता येथील आर्किटेक्ट आणि बिझनेसमन आहेत. त्यांची भेट महिमाच्या भावाच्या माध्यमातून झाली होती. बॉबी मुखर्जी हे महिमाच्या भावाचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या सातत्याने भेटीगाठी होत होत्या.
8 / 8
२००६ मध्ये बॉबी मुखर्जीसोबत विवाह केल्यानंतर महिमा चौधरीने २००७ मध्ये एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव आर्यना असं आहे. मात्र तिच्या जन्मानंतर काही काळातच महिमा आणि तिच्या पतीमध्ये मतभेद झाले. अखेरीस २०१३ मध्ये दोघेही वेगळे झाले होते. आता वयाच्या पन्नासाव्या वर्षी महिमा चौधरी सिंगल मदर म्हणून जीवन जगत आहे.
टॅग्स :महिमा चौधरीलिएंडर पेसबॉलिवूडरिलेशनशिप