'परदेस'फेम अभिनेत्रीचा झाला होता विचित्र अपघात; तोंडातून काढले होते 67 काचेचे तुकडे By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 9:38 AM1 / 12लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिचा गेल्या काही काळापासून कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र वरचेवर चाहत्यांमध्ये तिची चर्चा रंगते.2 / 12महिमा चौधरीचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत राहिलं तितकंच तिचं प्रोफेशनल लाइफही चर्चेत आलं.3 / 12महिमा आणि टेनिसपटू लिएंडर पेस यांची लव्हस्टोरी त्या काळात विशेष गाजली. जवळपास ३ वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर २००३ मध्ये लिएंडर पेस मॉडेल रिया पिल्लई हिच्या प्रेमात पडला.4 / 12एकदा महिमाने रिया आणि लिएंडरला एकमेकांशी बोलताना रंगेहात पकडलं. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. महिमाने लिएंडरला सोडलं.5 / 12ब्रेकअपनंतर महिमाला स्वत:ला सावरणं फार कठीण झालं होतं. ब्रेकअपचं दु:ख सहन करत असतानाच २००६ मध्ये ती बॉबी मुखर्जीला भेटली. कोलकत्ताचा असलेला बॉबी आर्किटेक्ट होता.6 / 12महिमा आणि बॉबी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लास वेगासमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये गपचूप साखरपुडा केला. त्यानंतर काही महिन्यातच महिमाचा बेबी बंप असलेला फोटो व्हायरल झाला.7 / 12२००७ मध्ये महिमाने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर महिमा आणि बॉबी यांच्यात खटके उडू लागले. अखेर २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.8 / 12सध्या महिमा सिंगल मदर म्हणून तिच्या लेकीचा सांभाळ करतीये.9 / 12दिल क्या करे या सिनेमावेळी महिमाचं करिअर पिकवर होतं. परंतु, १९९९ मध्ये तिचा मोठा अपघात झाला.10 / 12एका ट्रकने तिच्या गाडीला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये महिमाच्या चेहऱ्यावर आणि तोंडात 67 काचेचे तुकडे शिरले होते. या काळात अजय देवगण आणि काजोल यांनी तिला खूप मदत केली होती.11 / 12या अपघातामधून महिमा बरी होत नाही त्यातच तिला कॅन्सरचं निदान झालं. मात्र, तिने या कर्करोगावरही यशस्वीरित्या मात केली.12 / 12महिमा बऱ्याच वर्षानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. इमर्जन्सी या सिनेमात ती झळकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications