Mahima Chaudhry : "मला मोठा धक्का बसला, तो माझ्या पाठीमागे दुसरं कोणाला तरी डेट करत होता"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:59 IST
1 / 9अभिनेत्री महिमा चौधरीच्या पर्सनल लाईफमध्ये खूप उलथा-पालथ झाली आहे. लग्न आणि मुलीला जन्म देईपर्यंत अभिनेत्रीने अनेक समस्यांचा सामना केला आहे. 2 / 9महिमा लिएंडर पेससोबत रिलेशिपमध्ये असल्याने देखील चर्चेत होती. ते जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 3 / 9सोशल मीडियावर सध्या एका जुन्या न्यूज रिपोर्टची क्लिप व्हायरल होत आहे. यात ब्रेकअपची चर्चा सुरू होती आणि महिमाने याला उत्तर दिलं होतं. 4 / 9'मला मोठा धक्का बसला जेव्हा मला समजलं की, माझ्या पाठीमागे तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे.' 5 / 9'तो माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावरही माझ्या आयुष्यात काही बदल झाला नाही' असं महिमाने म्हटलं आहे. 6 / 9महिमाने सिंगल मदर असण्यावरही भाष्य केलं होतं. 'मी सिंगल मदर होती आणि मला पैशांची गरज होती.' 7 / 9'एक मुलगी असल्यावर चित्रपटात काम करणं अवघड आहे कारण त्यासाठी खूप जास्त वेळ द्यावा लागतो' असं अभिनेत्रीने सांगितलं8 / 9 महिमा चौधरीचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. 9 / 9