1 / 7बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळख असलेली मलायका अरोरा (Malaika Arora). तिचं वय ५० आहे यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. मलायका अनेक महिलांसाठी प्रेरणाच आहे.2 / 7सध्या मलायका बाली मध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिने आपल्या ट्रीपची झलक सोशल मीडियावर शेअर केली. तिच्या फोटोंवर चाहते फिदा झालेत.3 / 7या फोटोंमध्ये मलायकाची ग्लोइंग स्कीन दिसत आहे. निऑन रंगाच्या sunny आऊटफिटमध्ये ती लक्ष वेधून घेत आहे. थंड हवेची झुळूक आणि तिचे उडणारे केस असा सेल्फी तिने शेअर केला आहे.4 / 7बालीतही सध्या वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. मलायका तिथे नारळपाणी पिण्याचा आनंद घेत आहे. याचाही एक फोटो तिने शेअर केलाय.5 / 7उंच झोका आणि खाली निसर्गाचं विहंगम दृश्य ही बालीतील सर्वात आकर्षक जागा. अनेक पर्यटक बालीत झोक्यावरील फोटो पोस्ट करतात. मलायकालाही मोह आवरलेला नाही. तिनेही असाच झोक्यावरील सुंदर फोटो पोस्ट केला आहे.6 / 7मलायकाने आणखी एका फोटोत बालीचा सुंदर नजारा दाखवला आहे. यासोबत तिने फोटोवर हार्ट शेप बनवला आहे. तसंच बालीत खाण्याचीही कशी चंगळ सुरु आहे याची झलक तिने दाखवली आहे.7 / 7मलायकाच्या या व्हॅकेशन ट्रीपमध्ये तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर दिसत नसल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघंही अनेकदा व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. मात्र यावेळी मलायका नक्की कोणासोबत गेली? अर्जुनसोबत ब्रेकअप झालं का? असे प्रश्न चाहत्यांना पडलेत.