IN PICS : ‘खान’ कुटुंबासाठी मी कधीच...., घटस्फोटाच्या इतक्या वर्षानंतर मलायका अरोराने केला खुलासा...!! By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:12 PM1 / 10सतत या ना त्या कारणानं चर्चेत राहणारी मलायका अरोरा सध्या ‘मुव्हिंग इन विद मलायका’ या तिच्या शोमुळे चर्चेत आहे.2 / 10आपल्या या शोमध्ये मलायकाने पर्सनल लाईफबद्दलचे अनेक खुलासे केलेत. अगदी अरबाज खानशी झालेला घटस्फोट, ट्रोलिंग अशा अनेक गोष्टींवर ती बोलली.3 / 10आता मलायका ‘खान’ कुटुंबाबद्दल बोलली आहे. होय, खान कुटुंबाबद्दल मलायकाने असं काही सांगितलं की ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.4 / 10 शोमध्ये गेस्ट म्हणून आलेल्या करण जोहरशी बोलताना मलायकाने ‘खान’ कुटुंब व तिच्याबद्दल एक खुलासा केला.5 / 10अरबाज खानच्या कुटुंबासाठी मी नंबर 1 वर नाहीये. मी त्या कुटुंबाच्या यादीत कधीच नंबर 1 वर येऊ शकत नाही. पण हो, माझा मुलगा अरहानला मात्र खान कुटुंबातले सगळेच पाठींबा देतात, असं ती म्हणाली.6 / 10केवळ अरहानमुळे त्यांना माझी काळजी वाटते. त्याच्यामुळे ते मला पाठींबा देतात आणि त्यांचं हे वागणं एकप्रकारे योग्यच आहे, असं ती म्हणते. यावर करण मलायकाला तिला तिच्या अपघातावेळी खान कुटुंब हजर होतं, याचं स्मरण करून देतो.7 / 10 तुझ्या अपघातानंतर संपूर्ण कुटुंब तुझ्याबरोबर होतं, ते आम्ही पाहिलं. पूर्ण खान कुटुंब तिथे होतं. खरं तर काही लोक कायम आपल्यासोबत असतात, असं करण तिला म्हणतो.8 / 10मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. 2016 मध्ये मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला. 2017 मध्ये दोघंही कायदेशिररित्या विभक्त झाले. 9 / 10सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय, तर अरबाज मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका व अरबाज दोघंही आपआपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.10 / 10 घटस्फोट घेतल्यानंतरही अरबाज व मलायका दोघे त्यांचा मुलगा अरहानसाठी अनेकदा एकत्र दिसतात. मुलासोबत दोघंही एकत्र वेळ घालवतात. आणखी वाचा Subscribe to Notifications