अर्जुन तर आता आला, कधी 'या' अभिनेत्याच्या ‘प्रेमात’ होती मलायका, घरी करायची ब्लँक कॉल By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 2:00 PM1 / 8मलायका अरोराला चर्चेत कसं राहायचं ते चांगलंच कळतं. त्यामुळेच ती सतत चर्चेत असते. कधी हॉट फोटोंमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे. 2 / 8आज मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात वेडी आहे. पण कधीकाळी हीच मलायका एका बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात ठार वेडी झाली होती.3 / 8होय, खुद्द मलायकाने ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’च्या सेटवर हे सीक्रेट सांगितलं होतं. चंकी पांडे आणि नीलम कोठारी या शोच्या एका एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून आले होते. या एपिसोडमध्ये मलायकाने केलेला खुलासा ऐकून सगळेच थक्क झाले होते.4 / 8होय, मी चंकी पांडेची खूप मोठी फॅन होती, असं मलायकाने या एपिसोडमध्ये सांगितलं होतं. हे ऐकून खुद्द चंकीही हैराण झाला होता.5 / 8मी चंकीची खूप मोठी फॅन होती. मी माझ्या अलमारीत त्याचं मोठ्ठ पोस्टर लावलं हांतं. माझी छोटी बहिण अमृता व मी आम्ही दोघी मिळून चंकीच्या घरी ब्लँक कॉलही करायचो, असं मलायकाने सांगितलं होतं.6 / 8याच शोमध्ये मलायकाने आणखी काही खुलासे केले होते. माझा मुलगा मला आई नाही तर ब्रो म्हणन हाक मारतो, असंही तिने सांगितलं होतं.7 / 8मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा नुकतीच रंगली होती. पण आता या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 8 / 8अर्जुनने कुटुंबाच्या दबावामुळे मलायकाशी ब्रेकअप केल्याचा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. यानंतर अर्जुन व मलायका दोघांनीही ब्रेकअपच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications