भावी पतीसह मानसी नाईकचे प्री-वेडिंग फोटोशूट, कुणालाही घायाळ करेल असा आहे रोमँटिक अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 4:06 PM1 / 10गेले अनेक दिवस अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 2 / 10मानसीने तिच्या वाढदिवसाला प्रेमाची कबुली दिली होती, त्यानंतर दोघांनी साखरपुडासुद्धा केला. 3 / 10आता मानसीच्या लग्नाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.4 / 10आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे मानसी आणि तिच्या पतीने ठरवले आहे. 5 / 10मानसी आणि तिच्या पतीनेेसुद्धा आपल्या लग्नाआधी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. 6 / 10या फोटोशूटचे काही फोटो मानसीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 7 / 10शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. 8 / 10दोघांचा हा रोमँटिक अंदाज घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. 9 / 10मानसी नाईक १९ जानेवारीला लग्न करणार आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.10 / 10प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तर मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications