रुबाब!! डोक्यावर फेटा अन् हटके शर्ट आकाश ठोसरचा नवा लूक चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 8:00 AM1 / 9'सैराट' या पहिल्या चित्रपटातून प्रेक्षकांना आपलंसं करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. उत्तम अभिनयाच्या जोरावर आकाशने प्रेक्षकांची मनं जिंकली.2 / 9'सैराट'च्या यशानंतर आकाश 'झुंड' या बहुचर्चित चित्रपटातही झळकला. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली.3 / 9गेल्या काही काळामध्ये आकाशचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याचे स्टायलिश फोटो शेअर करत असतो.4 / 9झुंडच्या प्रमोशनवेळी आकाश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासून तो सातत्याने नेटकऱ्यांच्या भेटीला येत आहे.5 / 9आतापर्यंत आकाशने इन्स्टाग्राम व फेसबुकवर असंख्य पोस्ट केल्या आहेत. त्यातलीच त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.6 / 9अलिकडेच आकाशने एक नवं फोटोशूट केलं असून यात तो रुबाबदार अंदाजात दिसून येत आहे.7 / 9डोक्यावर फेटा आणि कलर्सफूल शर्ट अशा लूकमध्ये त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.8 / 9आकाशच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असतो. तसाच प्रतिसाद त्याच्या या फोटोलादेखील मिळत आहे.9 / 9आकाशच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असतो. तसाच प्रतिसाद त्याच्या या फोटोलादेखील मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications