अतुल कुलकर्णीची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; मराठीसह हिंदी कलाविश्वात कमावतीये नाव By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 7:00 AM1 / 10दर्जेदार अभिनयशैली म्हणजे काय हे अभिनेता अतुल कुलकर्णीकडे पाहिलं की लक्षात येतं.2 / 10कोणतीही भूमिका उत्तमरित्या पार पाडण्याचं कौशल्य अतुल कुलकर्णीमध्ये असल्यामुळे आज तो लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.3 / 10मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अतुल झळकला आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते.4 / 10सध्या सोशल मीडियावर अतुल कुलकर्णीच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. अतुलप्रमाणेच त्याची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 5 / 10अतुलच्या पत्नीचं नाव गीतांजली असं असून या दोघांचं लव्हमॅरेज आहे. १९९३ मध्ये एनएसडीमध्ये अतुल आणि गीतांजली यांची पहिली भेट झाली. या मैत्रीचं प्रेमात आणि नंतर लग्नात रुपांतर झालं.6 / 10२९ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात या दोघांनी लग्न केलं.7 / 10गीतांजलीदेखील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक मराठी, हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ती रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.8 / 10‘सेक्स, मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप’, ‘गजब कहानी’, ‘ड्रीम्स ऑफ तलीम’, ‘पिया बहुरुपिया’ यांसारख्या नाटकांमध्ये तिने काम केलं आहे.9 / 10'कोर्ट' या सिनेमात गीतांजली कुलकर्णी यांनी ‘नूतन’ या पब्लिक प्रोसिक्युटरची भूमिका साकारली होती. 10 / 10गीतांजली सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. आणखी वाचा Subscribe to Notifications