Join us

शरद पोंक्षेंच्या लेकीला कधी पाहिलं आहे का? अभिनय सोडून अन्य क्षेत्रात करते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:37 AM

1 / 9
मराठी कलाविश्वातील गुणी आणि आघाडीचा अभिनेता म्हणजे शरद पोंक्षे. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
2 / 9
उत्तम अभिनयासह शरद पोंक्षे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. अनेकदा जाहीरपणे एखाद्या विषयावर भाष्य करत त्यांनी त्यांचं मत नोंदवलं आहे. परिणामी, बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.
3 / 9
काही वर्षांपूर्वीच त्यांना कर्करोग झाला होता. मात्र, या असाध्य आजारावर मात करत ते पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले. इतकंच नाही तर त्यांन कलाविश्वात पुन्हा कमबॅकही केलं.
4 / 9
सध्या शरद पोंक्षे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत विनायक कानेटकर ही भूमिका साकारत आहेत.
5 / 9
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने त्यांच्या लेकीची म्हणजेच अपूर्वाची भूमिका साकारली आहे. परंतु, खऱ्या आयुष्यातही शरद पोंक्षे एका मुलीचे वडील आहेत.
6 / 9
शरद पोंक्षे यांना एक मुलगी असून ती कलाविश्वापासून कोसोदूर असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे ती एका वेगळ्या क्षेत्रात तिचं नशीब आजमावत आहे.
7 / 9
शरद पोंक्षे यांच्या लेकीचं नाव सिद्धी असं असून ती मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असल्याचं सांगण्यात येतं.
8 / 9
शरद पोंक्षे यांची लेक सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. मात्र, शरद पोंक्षे अनेकदा तिच्याविषयीच्या पोस्ट शेअर करत असतात.
9 / 9
शरद पोंक्षे यांना कर्करोग झालेला असताना सिद्धीने त्यांची प्रचंड सेवा केली. विशेष म्हणजे दररोज रुग्णालयात ये-जा करुनही ती १२ वीत ८६ टक्के मार्क मिळवत उत्तीर्ण झाली.
टॅग्स :शरद पोंक्षेसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन