Sonalee Kulkarni : कुणालसोबत लग्न करण्याआधी सोनाली होती ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात..., ‘अप्सरे’नं स्वत:च केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 10:38 AM1 / 11महाराष्ट्राची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी हिने 2021 मध्ये लॉकडाऊनच्सा काळात कुणाल बेनोडेकरबरोबर दुबईत रजिस्टर मॅरेज केलं होतं. ते सुद्धा अगदी साध्या पद्धतीने. 2 / 11या लग्नात अगदी सोनालीचे कुटुंबीय सामील होऊ शकलं नव्हतं. शिवाय लग्नाची हौसमौजही करता आली नव्हती. त्यामुळे यावर्षी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सोनाली व कुणाल यांनी लंडनमध्ये पुन्हा एकदा विधिवत शाही लग्न केलं. 3 / 11आताश: सोनाली व कुणाल सुखात संसार करताहेत. दोघंही एकमेकांसोबत आनंदी आहेत. पण कुणाल हे सोनालीचं पहिलं प्रेम नव्हतं. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुद्द सोनालीने हा खुलासा केला.4 / 11होय,सोनालीने नुकतंच एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या पहिल्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. कॉजेलच्या दिवसातील ते तिचं पहिलं सीरिअस रिलेशनशिप होतं.5 / 11ती म्हणाली, “कॉलेजमध्ये असताना मी माझ्या एका सिनियरला प्रपोज केलं होतं. तो मला प्रपोज करेल, अशी माझी अपेक्षा होती. पण त्याने मला प्रपोज केलं नाही. अखेर मीच त्याला प्रपोज केलं. त्याने मला होकारही दिला.”6 / 11“आम्ही बराच वेळ एकत्र घालवत होतो. पाच वर्ष आम्ही रिलशेनशिपमध्ये होते. ते माझं पहिलं रिलेशनशिप होतं, जे बराच काळ टिकलं. तेच पहिलं सीरिअस रिलेशन होतं. पण पाच वर्षानंतर आमचा ब्रेकअप झाला”, असं तिने सांगितलं.7 / 11पहिलं रिलेशनशिप संपलं. पुढे सोनाली चित्रपटसृष्टीत आली. एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिने नाव कमावलं. २०१७ मध्ये तिच्या आयुष्यात कुणालची एन्ट्री झाली.8 / 11२०१७ मध्ये काही कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून सोनाली व कुणालची भेट झाली होती. पहिल्यांदा ते ऑनलाईन भेटले. चॅट करता करता त्यांची मस्त मैत्री झाली आणि मग दोघंही पहिल्यांदा लंडनला भेटले.9 / 11यानंतर कुणाल दुबईमध्ये शिफ्ट झाला. मग मात्र दोघांच्या भेटी वाढल्या. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. पण गाडी पुढे सरकेचना. बघता बघता दोन वर्ष झालीत. अखेर 2 वर्षानंतर सोनालीने कुणालला अक्षरश: धमकीच दिली. 10 / 11या भेटीनंतर जर का तू पुढे काही ऑफिशियल केलं नाही तर माझे आई-वडील मला तुला भेटायला पाठवायचे नाहीत, असं तिने त्याला बजावलं.11 / 11यानंतर दुसऱ्यादिवशी सोनालीची फ्लाइट होती. तिने कुणालला एअरपोर्टला सोडायला सांगितलं. ती लिफ्टपाशी उभी होती. अचानक कुणालने मला हाक मारली. मग सोनालीच्या आवडीचं गाणं लावलं आणि सोनालीला त्यावेळी तिथेच प्रपोज केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications