Join us

उदय सबनीस याची लेकदेखील आहे अभिनेत्री; फिल्मफेअर ट्रॉफीवर कोरलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 18:40 IST

1 / 10
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकाच मुरलेला अभिनेता म्हणजे उदय सबनीस.
2 / 10
मालिकांसह त्यांनी अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी अनेक हॉलिवूड हिंदी डब चित्रपटांना आपला आवाजही दिला आहे.
3 / 10
आभाळमाया, अवघाची संसार, माझे पती सौभाग्यवती, नवे लक्ष्य अशा कितीतरी मालिकांमध्ये दमदार कामगिरी करुन उदय सबनीस यांनी लोकप्रियता मिळवली आहे.
4 / 10
उदय सबनीस यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या लेकीने कलाविश्वात पदार्पण केलं आहे.
5 / 10
त्यांच्या लेकीचं नाव समिहा सबनीस असं असून ती एकाच वेळी अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती या तिहेरी भूमिका पार पाडत आहे.
6 / 10
समिहाने नुकतंच फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. सोलकढी या लघुपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे.
7 / 10
या लघुपटात तिच्यासोबत शुभांगी गोखले आणि निरंजन कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
8 / 10
“एक चित्रपट-दिग्दर्शक म्हणून माझ्या मनात जी काही शंका होती, ती फिल्मफेअरच्या रात्रीच्या वादळी वाऱ्याबरोबर उडून गेली”. पॉप्युलर चॉइस अवॉर्ड, सर्वोत्कृष्ट लघुपट, २०२३ जिंकल्याबद्दल सोल कढीच्या संपूर्ण टीमचे आभार, असं कॅप्शन देत समिहाने पोस्ट तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं.
9 / 10
समिहाला अभिनयासह भटकंती करायची विशेष आवड आहे. ती बऱ्याचदा नवनवीन ठिकाणांना भेट देत असते.
10 / 10
समिहा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीशॉर्ट फिल्मफिल्मफेअर अवॉर्ड