कलाविश्वापासून कोसो दूर आहे उपेंद्र लिमयेची पत्नी; जनसेवेसाठी करतीये 'या' क्षेत्रात काम By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 3:17 PM1 / 8रांगडा स्वभाव, जबरदस्त अभिनयशैली यामुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये.2 / 8जोगवा, मुळशी पॅटर्न, सावरखेड एक गाव, कोकणस्थ अशा कितीतरी चित्रपटांमध्ये उपेंद्र झळकला आहे.3 / 8मराठी कलाविश्वाप्रमाणेच त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.4 / 8उपेंद्रचा कलाविश्वात जरी सक्रीय वावर असला तरीदेखील सोशल मीडियावर तो फारसा सक्रीय नाही.5 / 8 उपेंद्र लिमये मुळचा पुण्याचा असून त्याच्या फिल्मी करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे.6 / 8उपेंद्र लिमयेचं लग्न झालं असून त्याला भैरवी आणि वेद अशी दोन मुलं देखील आहेत.7 / 8उपेंद्रच्या पत्नीचं नाव स्वाती लिमये आहे.8 / 8स्वाती कलाविश्वापासून दूर आहे. मात्र, ती समाजसेवेसाठी काम करते. स्वाती एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications