हिरवी साडी अन् केसांत लाल गुलाब, अदिती द्रविडचं भाजीमंडईत फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 4:59 PM1 / 7अदिती द्रविड ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 2 / 7'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील भूमिकेने अदितीला प्रसिद्धी मिळवून दिली. याबरोबरच 'सुंदरा मनामध्ये भरली'मध्येही ती दिसली होती. 3 / 7अदिती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. 4 / 7नुकतंच अदितीने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 5 / 7या फोटोमध्ये अदितीने हिरव्या रंगाची साडी नेसून केसांत लाल गुलाब माळल्याचं दिसत आहे. 6 / 7अदितीने भाजीमंडईत हे फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे. तिने फोटोंसाठी पोझही दिल्याचं दिसत आहे. 7 / 7अदितीचे हे फोटोशूट चर्चेत असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications