लंडनमध्ये चंद्राची हवा; स्टायलिश लूकमध्ये अमृताने शेअर केले फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 3:43 PM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (amruta khanvilkar). उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर अमृताने अल्पावधीत प्रेक्षकांची मन जिंकली.2 / 8मराठीसह बॉलिवूडमध्येही तिने तिचं नशीब आजमावलं आहे.त्यामुळे आज इंडस्ट्रीमध्ये तिचं नाव कायम चर्चेत येत असते. 3 / 8राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली आहे. इतकंच नाही तर 'लुटेरे' या वेबसीरिजच्या माध्यमातून तिने आता ओटीटीवरही पदार्पण केलं आहे. 4 / 8अमृता अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगना आहे. कोणताही डान्स ती अत्यंत सुंदरपणे सादर करते.5 / 8सध्या अमृताचा व्हेकेशन मूड ऑन असून ती विदेश दौऱ्यावर आहे. अमृता तिच्या मित्रपरिवारासोबत लंडनला गेली आहे.6 / 8अमृताने लंडन दौऱ्याचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 7 / 8या फोटोमध्ये ती कमालीची स्टायलिश लूकमध्ये दिसून येत आहेत.8 / 8काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications