पारंपरिक कपड्यांना वेस्टर्न टच! जुई गडकरीचा खणाचा डिझायनर ड्रेस चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 1:30 PM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. उत्तम अभिनयाच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळली आहे.2 / 8गेल्या काही दिवसांपासून जुई सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. यात खासकरुन तिच्या पर्सनल आयुष्याची चर्चा रंगत आहे.3 / 8अलिकडेच जुईने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या पर्सनल आयुष्याविषयी बरेच खुलासे केले.4 / 8जुई सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.त्यामुळे कायम तिच्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांना देते.5 / 8अलिकडेच तिने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.6 / 8जुई कायम तिच्या साध्या आणि सिंपल लूकमुळे चर्चेत येत असते. मात्र, यावेळी तिने तिच्या लूकमध्ये एक ट्विस्ट केला.7 / 8जुईने पहिल्यांदाच वेस्टर्न टच असलेला लूक केला होता. तिने हा ड्रेस चक्क खणाच्या कापडापासून तयार केला होता.8 / 8या आऊटफिटला सूट होणारा असा सुरेख मेकअप जुईने केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications