अरुंधतीप्रमाणेच अगदी साधीभोळी आहे मधुराणीची आई; पाहा तिच्या रिअल लाइफ आईचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 6:00 AM1 / 9आपल्या उत्तम अभिनयासह स्वभावातील साधेपणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर.2 / 9आजवर असंख्य मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करणाऱ्या मधुराणीला 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.3 / 9सध्या या मालिकेत ती अरुंधती या साध्याभोळ्या गृहिणीची भूमिका साकारत आहे. मात्र, हीच गृहिणी घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे.4 / 9अरुंधतीमध्ये प्रत्येक गृहिणी स्वत:ला पाहात असल्यामुळे ही मालिका आणि भूमिका विशेष लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीविषयी जाणून घेण्यासाठीही प्रेक्षकांचे प्रयत्न सुरु झाले.5 / 9मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती तिच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.6 / 9उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच कवयित्री असलेली मधुराणी अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.7 / 9अलिकडेच तिने मदर्स डे साजरा केला. यावेळी तिने तिच्या आईसोबतचा एक गोड फोटो शेअर केला. या फोटोकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.8 / 9मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि तिची आई दिसून येत आहेत. विशेष म्हणजे तिच्या आईच्या आईकडे पाहिल्यावर अनेकांनी त्यांची तुलना अरुंधतीच्या स्वभावासोबत केली आहे. 9 / 9मधुराणीची आई अगदी अरुंधतीप्रमाणे साधीभोळी असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications