Join us

मोकळे केस, स्मित हास्य! साध्या, सोज्वळ लूकमध्ये मधुराणीने केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 5:08 PM

1 / 9
उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर.
2 / 9
सध्या मधुराणी आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे ती तुफान लोकप्रिय झाली आहे.
3 / 9
कलाविश्वाप्रमाणेच मधुराणी सोशल मीडियावरही सक्रीय असून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
4 / 9
गेल्या काही दिवसांपासून मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय झाली आहे. त्यामुळे सातत्याने ती तिचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे.
5 / 9
मधुराणी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्रीदेखील आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती कवितांचे कार्यक्रम करत असते.
6 / 9
अलिकडेच मधुराणी एका कवितेच्या कार्यक्रमासाठी इंदौरला गेली होती. यावेळी तिने छान साडी नेसली होती.
7 / 9
मधुराणीने या इंदौर दौऱ्यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
8 / 9
मधुराणीने यावेळी यल्लो रंगाची छान साडी नेसली होती. तसंच त्यावर हिरव्या रंगाचा मोत्यांचा गळ्यातल्याचा सेट परिधान केला होता. या लूकला फायनल टच देण्यासाठी तिने केसही मोकळे सोडले होते.
9 / 9
मधुराणीच्या प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असते. त्यामुळे तिच्या या फोटोवरही नेटकरी लाइक्स व कमेंटचा पाऊस पाडत आहेत.
टॅग्स :मधुराणी प्रभुलकरटिव्ही कलाकारटेलिव्हिजन