लग्न आयराचं पण चर्चा मात्र मिथिला पालकरची; ग्लॅमरस लूक ठरला चर्चेचा विषय By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 5:20 PM1 / 8बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिने नुकतीच नुपूर शिखरे या मराठमोळ्या तरुणासोबत लग्नगाठ बांधली आहे.2 / 8या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. बॉलिवूडच्या ग्रँड वेडिंगमध्ये दोन मराठमोळ्या कलाकारांनीही हजेरी लावली होती.3 / 8आयरा आणि नुपूरच्या लग्नात अभिनेत्री मिथिला पालकर आणि सारंग साठे या दोघांनी हजेरी लावली होती.4 / 8या लग्नसोहळ्यात मिथिलाच्या लूकची सर्वात जास्त चर्चा झाली.5 / 8मिथिलाने लाल रंगाची सुरेख डिझायनर साडी परिधान केली होती. ज्यामुळे लोकांच्या नजरा तिच्याकडेच वेधल्या होत्या.6 / 8या साडीतील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.7 / 8मिथिलाने या साडीला आणि तिच्या लूकला साजेसा असा मेकअप आणि हेअर स्टाइलही केली आहे.8 / 8मिथिला, नुपूरची चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे नुपूर-आयराच्या केळवणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रत्येक कार्यात मिथिलाचा सहभाग होता. आणखी वाचा Subscribe to Notifications