अभिनय सोडून अमेरिकेत स्थायिक झाली 'ही' मराठी अभिनेत्री, आता आहे गोंडस मुलीची आई, पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 09:26 IST
1 / 9'माझिया प्रियाला प्रित कळेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आहे.2 / 9काही मोजक्या मराठी मालिकांमध्ये काम केल्यानंतर मृणालने अभिनय क्षेत्राला रामराम केला आणि ती घरसंसारात व्यस्त झाली. 3 / 9२०२० पर्यंत मृणालने अभिनय क्षेत्रात काम केले. मृणाल 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत शेवटची दिसली. यातील तिची आणि शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांनाही आवडली.4 / 9२०१६ मध्ये मृणालने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कामानिमित्त तो आधीपासूनच अमेरिकेत असल्याकारणाने नंतर मृणाललाही तिकडेच स्थायिक व्हावे लागले.5 / 9सुखाच्या सरींनी मालिकेवेळी ती भारतात आणि नीरज अमेरिकेतच होता. मालिका संपताच ती अमेरिकेत गेली. यानंतर तिचा बदललेला लुक पाहून चाहत्यांनाही विश्वास बसला नाही.6 / 9अमेरिकेत असली तरी ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना आयुष्यातील घडामोडींचे अपडेट्स देत असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती सतत फोटो पोस्ट करत असते.7 / 9छोट्या केसात मृणालला बघून चाहत्यांना विश्वासच बसला नाही की ही तीच मृणाल आहे.तिचे नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.8 / 9गेल्याच वर्षी २४ मार्च रोजी मृणालने गोंडस मुलीला जन्म दिला.तिचे नाव नुर्वी असे ठेवण्यात आले. 9 / 9मृणाल आता पुन्हा अभिनय क्षेत्रात परतणार का याबद्दल तिने अजुन काहीच सांगितलेले नाही. सध्या ती नवरा आणि आता मुलीसोबत अमेरिकेतच आहे. तरी चाहत्यांना मात्र तिच्या कमबॅकची प्रतिक्षा असणार आहे.