Join us

"अभिनयातील करिअरसाठी मातृत्वाचा त्याग", मराठी अभिनेत्रीने घेतला निर्णय; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:38 IST

1 / 8
मनोरंजनसृष्टीत अनेक अभिनेत्री करिअर घडवण्यासाठी उशिरा लग्न करतात. त्यामुळे प्रेग्नंसीही उशिरा होते. तर काही जणी प्रेग्नंसी टाळतात.
2 / 8
अशीच एक मराठी अभिनेत्री आहे जिने अभिनयातील करिअरसाठी मातृत्वाचा त्याग केला आहे. अभिनय बंद होईल म्हणून तिने बेबी प्लॅनिंगच केलेलं नाही.
3 / 8
ही अभिनेत्री आहे 'पक पक पकाक' या मराठी सिनेमात झळकलेली तिच्या लग्नाला १० वर्ष झाली आहेत.
4 / 8
एका मुलाखतीत नारायणी म्हणाली होती की, 'आई होण्याचा निर्णय मी एका झटक्यात घेऊ शकत नाही. हा खूप मोठा निर्णय आहे आणि उत्साहात मी तशी चूक करु शकत नाही.'
5 / 8
'माझ्या भावाबहिणींच्या मुलांवर माझं खूप प्रेम आहे. मी त्यांनाच माझी मुलं मानते. मला ४ बहिणी आणि एक भाऊ आहे. सगळ्यांना मुलं आहेत. मीच त्यांची लहानपणापासून देखभाल केली आहे.'
6 / 8
'माझ्या आयुष्यात मी समाधानी आहे. माझं जे काही आहे ते त्यांचंच आहे. आम्ही नवरा बायको एकमेकांशी बोलतो. मी खूप प्रॅक्टिकल विचार करतो.'
7 / 8
'आई होणं मोठी जबाबदारी आहे. मला याचे फायदे-तोटे माहित आहेत. जर मी बेबी प्लॅनिंग केलं तर मी काम करणं बंद करेन. पण मला काम करणं सोडायचं नाही. मला हे आवडतं. सगळे प्रयत्न करुन झाल्यावर मी हा निर्णय घेतला आहे.'
8 / 8
नारायणी शास्त्री ४६ वर्षांची आहे. २०१५ साली तिने ब्रिटनच्या स्टीव्हन ग्रेवरसोबत गुपचूप लग्न केलं होतं. काही वर्षांपूर्वीच दोघं गोव्याला शिफ्ट झाले.
टॅग्स :नारायणी शास्त्रीमराठी अभिनेताटेलिव्हिजनपरिवार