Join us

लग्नानंतर करिअर सोडून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली मराठमोळी अभिनेत्री, नवरा नक्की काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:22 IST

1 / 8
'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) आठवतेय? आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने तिने सर्वांना प्रेमात पाडलं.
2 / 8
नेहा गद्रेने नंतर 'अजूनही चांदरात आहे' मालिकेतही काम केलं. 'मोकळा श्वास', 'गडबड झाली' या सिनेमातही ती झळकली.
3 / 8
मात्र ही गोड अभिनेत्री अचानक गायब झाली. २ मार्च २०१९ रोजी तिने ईशान बापटशी लग्न केले. लग्नानंतर नेहा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली.
4 / 8
नेहाने मग ऑस्ट्रेलियात तिचं वेगळं करिअर घडवलं. तिने डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहूड केअर अँड एज्युकेशन मध्ये पदवी मिळवली. ती आता शिक्षिका आहे. अभिनेत्री ते शिक्षिका असं तिने इन्स्टाग्राम बायकोमध्ये लिहिले आहे.
5 / 8
नेहाचा नवरा हा केटरिंग डिव्हीजन मध्ये आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड पार्लमेंटमध्ये तो काम करतो असं त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलवर नमूद केलं आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी संवाद कौशल्य असावं लागतं.
6 / 8
थोडक्यात ईशान हॉस्पिटॅलिटी मॅनेजर आहे. रेस्टॉरंटला फूड, ड्रिंक पुरवठा करण्याचं त्याचं काम आहे. त्याने ब्रिस्बेन विद्यापिठातून आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे.
7 / 8
नेहा आणि ईशान यांच्या लग्नाला ६ वर्ष झाली आहेत. विशेष म्हणजे नुकतेच दोघंही आई बाबा झाले आहेत. १० फेब्रुवारी रोजी नेहाने ऑस्ट्रेलियातच गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ईवान असं ठेवण्यात आलं.
8 / 8
नेहाच्या मॅटर्निटी फोटोशूटची चांगलीच चर्चा झाली. वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
टॅग्स :नेहा गद्रेमराठी अभिनेतापरिवारटिव्ही कलाकारआॅस्ट्रेलिया