Join us

PHOTOS : काय केस, काय चेहरा, काय लुक.... ओक्के आहे सगळं! प्राजक्ता माळीचा ‘वसंतसेना’ लुक पाहून चाहते घायाळ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 11:11 AM

1 / 8
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. कधी ग्लॅमरस फोटोशूट, कधी व्हॅकेशनचे फोटो तर कधी वेगवेगळ्या पोस्ट यामुळे प्राजक्ता सतत चर्चेत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या नव्या फोटोशूटची.
2 / 8
होय, नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्स पाऊस पडला, चाहते अक्षरश: तिच्या या फोटोंवर फिदा झालेत.
3 / 8
वसंतसेना..., असं लिहित प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवरून नजर हटवणं कठीण आहे. ती कमालीची सुंदर दिसतेय.
4 / 8
काळ्या रंगाच्या डिझाईनर साडीत तिने हे फोटोशूट केलं आहे. साडीवर तिने ऑफ शोल्डर ब्लाऊज घातलं आहे. या साडीत प्राजुने झक्कास पोझ दिल्या आहेत.
5 / 8
सगळ्यांत युनिक आहेत ते तिचे दागिने. होय, तिच्या हटके दागिन्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत.
6 / 8
मरतो का काय मी, अशी भन्नाट कमेंट एका चाहत्याने केली आहे. काय गोड दिसतेय प्राजु, घायाळ केलंस,अशी कमेंट एकाने लिहिली आहे. लहान लहान पोरांना असं पावसात गरम करून काय मिळतं हो? असा मजेशी प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे.
7 / 8
किती गोड दिसतेस, कुणाचीही दृष्ट नको लागू तुला, अशी एक कमेंटही तिच्या फोटोवर पाहायला मिळतेय. काय केस, काय चेहरा, काय लुक़.. ओक्के आहे सगळं, अशी कमेंटही एकाने हटकून केली आहे.
8 / 8
अलीकडेच प्राजक्ता माळीची ‘रानबाजार’ ही सीरिज विशेष गाजली होती. प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळते. लवकरच या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू होणार आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळी