काय सांगता रिंकूचा आहे बॉयफ्रेंड? चाहत्याने नाव विचारताच अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 1:02 PM1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. उत्तम अभिनयाच्या जोरावर रिंकूने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.2 / 9'सैराट', 'कागर', 'मेकअप', 'आठवा रंग प्रेमाचा', 'झुंड' अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये ती झळकली आहे.3 / 9अलिकडेच रिंकू 'झिम्मा 2' या सिनेमात झळकली. या सिनेमात तानिया ही भूमिका साकारुन तिने विशेष लोकप्रियता मिळवली.4 / 9रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात रहात असते.5 / 9अलिकडेच रिंकूने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले.6 / 9चाहत्यांनी विचारलेल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं तिने यावेळी दिली.7 / 9रिंकूच्या एका चाहत्याने तिला थेट तिच्या बॉयफ्रेंडविषयी प्रश्न विचारला. विशेष म्हणजे रिंकूने या प्रश्नाचं उत्तर दिलं.8 / 9'तुमच्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे?' असा प्रश्न तिच्या चाहत्याने विचारला. त्यावर, 'बॉयफ्रेंडचं नाही तर नाव पण नाही', असं उत्तर रिंकूने दिलं.9 / 9दरम्यान, तिच्या या उत्तरामुळे रिंकू अजूनही सिंगल असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications