Join us

रोखूनी मजला पाहू नका! घायाळ करणारे रुपाली भोसलेचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 3:51 PM

1 / 7
'आई कुठे काय करते' या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.
2 / 7
या मालिकेत संजना ही ग्रे शेड भूमिका साकारुन रुपाली विशेष लोकप्रिय झाली. त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये तिचं आवर्जून नाव घेतलं जातं.
3 / 7
पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी रुपाली खऱ्या आयुष्यातही तशीच आहे. त्यामुळे तिचे प्रत्येक फोटो, व्हिडीओ चर्चेत येत असतात.
4 / 7
रुपालीला साड्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती साडीमध्येच फोटोशूट करत असल्याचं दिसून येतं.
5 / 7
अलिकडेच रुपालीने गुलाबी रंगाच्या साडीत छान फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6 / 7
रुपालीने या फोटोमध्ये अगदी हलकासा मेकअप केल्याचं दिसून येतं आहे.
7 / 7
रुपालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.
टॅग्स :रुपाली भोसलेटेलिव्हिजनआई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार