marathi actress Sai Manjrekar debut with 37 years older salman khan in dabangg 3 got trolled
मराठी दिग्दर्शकाची लेक, ३७ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केला रोमान्स; आता ट्रोलिंगवर म्हणाली... By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 2:54 PM1 / 7फिल्म इंडस्ट्रीत शाहरुख, सलमान, आमिर, हृतिक, अक्षय कुमार हे असे स्टार कलाकार आहेत जे त्यांच्याहून कित्येक वर्ष लहान अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स करतात. अनेकदा यावरुन त्यांना ट्रोलही केलं गेलं आहे.2 / 7अशीच एक अभिनेत्री आहे जिने पदार्पणातच ३७ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्स केला. अभिनेत्री मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी आहे. तिने थेट सलमान खानसोबत एका प्रसिद्ध फ्रँचायजीमधून पदार्पण केलं.3 / 7ही अभिनेत्री आहे सई मांजरेकर. सईने 2019 साली वयाच्या १८ व्या वर्षी सलमान खानच्या 'दबंग 3' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यात तिने सलमानच्या आधीच्या गर्लफ्रेंडची खूशची भूमिका साकारली. त्यावेळी सलमान खान आणि सई दोघांना त्यांच्या वयातील अंतर बघता खूप ट्रोल केलं गेलं. 4 / 7नुकतंच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, 'जेव्हा हे ट्रोलिंग झालं तेव्हा मी याबाबतीत अज्ञात होते. कारण माझे कोणी पीआर, मॅनेजर नव्हते. पण सहा महिन्यांनंतर जेव्हा मला हे समजलं तेव्हा माझ्यावर एवढा परिणाम झाला नाही. कारण सहा महिने उलटून गेले होते. 5 / 7ती पुढे म्हणाली, 'तसंच मी खूप स्ट्राँग आहे. काहीही झालं तरी मी लवकर भावनावश होत नाही. जर कोणी कौतुक केलं तर मी खूश होईन आणि चुका सांगितल्या तर त्याही घेईन. मी अशीच व्यक्ती आहे. मला काहीच फरक पडत नाही.'6 / 7'दबंग ३' नंतर सईने साऊथ इंडस्ट्रीत काम केलं. 2022 साली तिचे 'घनी','मेजर' हे सिनेमे आले. पुढील काही वर्षात 'स्कंदा','कुच खट्टा हो जाए' यातही ती दिसली. तर नुकताच तिचा 'औरो मे कहा दम था' रिलीज झाला.7 / 7सईच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं तर तिचं नाव लोकप्रिय गायक गुरु रंधावासोबत जोडलं गेलं. मात्र सईने याचंही खंडन केलं आहे. सध्या करिअर फोकस करत असून सिंगल असल्याचं ती म्हणाली. आणखी वाचा Subscribe to Notifications