"दिसते मी भारी राजा...", लाल साडी अन् केसांत गजरा, सईवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 1:57 PM1 / 8सई ताम्हणकर ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच सईने बॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप पाडली आहे. 2 / 8अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या सईचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन सई चाहत्यांना अपडेट्स देत असते. 3 / 8नुकतंच सईने मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 4 / 8या फोटोंमध्ये सईने लाल रंगाची पैठणी नेसून पारंपरिक लूक केला आहे. केसांत गजरा माळलेल्या सईच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 5 / 8यावर सईने लांब बाह्यांचा ब्लाऊज घातला आहे. कानात झुमके घालत तिने मराठमोळा लूक केला आहे. 6 / 8नेहमी बोल्ड अँड ब्युटिफूल दिसणाऱ्या सईचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 7 / 8या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 'दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ', 'साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा!' अशा कमेंट केल्या आहेत. 8 / 8सई लवकरच नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications