IN PICS : गुणी आई-बाबाची गुणी लेक... 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सखी गोखले आहेच भारी...!! By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 4:56 PM1 / 9ख्यातनाम अभिनेते मोहन गोखले आज आपल्यात नाही. पण त्यांच्यारूपाने त्यांची लेक सखी गोखले त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे.2 / 9सखी अवघ्या 6 वर्षांची असतानाच तिच्या बाबांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून आईनेच तिला वाढवलं. शिकवलं. सखीची आई शुभांगी गोखले या सुद्धा गुणी अभिनेत्री. त्यांची लेक असलेली सखी ही सुद्धा तेवढीच गुणी.3 / 9सखीनं 10 वी पर्यंतचं शिक्षण सह्याद्री स्कूल येथे घेतलं. यानंतर ती रूपारेल कॉलेजमध्ये ती शिकली. पुढे फोटोग्राफी, अभिनय आणि आता लंडनमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली.4 / 9आईने म्हणजे शुभांगी गोखले यांनी तिला कॅमेरा गिफ्ट केला होता. यामुळे सखीला फोटोग्राफीमध्ये सुद्धा रुची निर्माण झाली. भारती विद्यापीठ पुणे येथून फॅशन आणि फाईन आर्ट्स फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. अभिनय क्षेत्रात येण्याआधी सखीने जयदीप ओबेराय यांच्याकडे फोटोग्राफीसाठी इंटर्नशिप केली आहे.5 / 9सखीने तिच्या करिअरची सुरुवात काही हिंदी जाहिरातींमधून केली होती. त्यानंतर तिने 2013 मध्ये ‘रंगरेझ’ या हिंदी चित्रपटात वेणू नावाची छोटी भूमिका साकारली होती. 6 / 9‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये रेश्मा इनामदार म्हणून भूमिका साकारण्यापूर्वी ती एका एकांकिकेचाही भाग होती. ही मालिका संपल्यानंतर, ती ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातही काम करताना दिसली होती .7 / 9मालिका आणि नाटकात काम केल्यानंतर सखी पुढील शिक्षणासाठी युनायटेड किंग्डमला गेली. तिथे मास्टर इन आर्ट क्युरेशनचा कोर्स केला. नुकतीच तिला मास्टर्स पदवी बहाल करण्यात आला.8 / 9सखी विवाहित आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या सेटवर सुव्रत जोशी तिला भेटला आणि दोघांत मैत्री झाली. पुढे ती प्रेमात बदलली. पाठोपाठ दोघांचं लग्न झालं.9 / 9सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची भेट दिल दोस्ती दुनियादारीच्या सेटवर झाली. पण याआधी ते दोघे खुप वर्षांपासुनचे फेसबुक फ्रेंड होते. आणखी वाचा Subscribe to Notifications