पडद्यावरील प्रेमळ आई सविता प्रभुणेंची लेक आहे सात्विका सिंह, तिच्या लग्नाचे सुंदर Photos पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 18:06 IST
1 / 9'पवित्र रिश्ता', 'कुसूम' अशा हिंदी मालिकांमधून प्रेमळ आईची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री सविता प्रभुणे (Savita Prabhune) मोठ्या प्रतिक्षेनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर परतल्या आहेत. स्टार प्रवाहवर नव्यानेच सुरु झालेल्या 'घरोघरी मातीच्या चुली' मध्ये त्या सासूच्या भूमिकेत आहेत. 2 / 9५९ वर्षीय सविता प्रभुणे सिंगल मदर आहेत. घटस्फोटानंतर त्यांनी एकटीनेच लेकीचा सांभाळ केला. सात्विका (Satvika) असं त्यांच्या लेकीचं नाव आहे. सात्विकाही अगदी आईप्रमाणेच अतिशय सुंदर आहे.3 / 9सात्विकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे तिच्या लग्नाचे फोटो आहेत. रुद्रेश आनंदसोबत तिने काही वर्षांपूर्वीच लग्नगाठ बांधली. सात्विकाच्या हळद, मेहंदी आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. सौजन्य -WedMeGood4 / 9व्हाईट प्रिंटेड लेहेंग, आकर्षक ज्वेलरी अशा लूकमध्ये ती मेहंदी फंक्शनसाठी तयार झालेली दिसत आहे. बॅकग्राऊंडला फुलांची सुंदर सजावट केलेली आहे. सौजन्य -WedMeGood5 / 9सात्विकाच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर ग्लो आलेला दिसत आहे. नव्या नवरीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो तसा तिच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत आहे. तिने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केलं आहे. सौजन्य -WedMeGood6 / 9तर हळदीसाठी तिने घातलेल्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. तसंच बिंदी, कानातले अशी सोन्याची आकर्षक ज्वेलरीही आहे. सौजन्य -WedMeGood7 / 9सात्विका आणि रुद्रेश दोघांवर फुलांची उधळण करण्यात आली आहे. या फोटोत सविता प्रभुणेही दिसत आहेत. गुलाबी काठ असलेल्या पिवळी साडीत त्याही खूप सुरेख दिसत आहेत. सौजन्य -WedMeGood8 / 9तर लग्नाच्या दिवशी सात्विकाने लाल रंगाचा लेहंगा आणि गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे. गळ्यात सुंदर हार, सोन्याची नथ, बांगड्या या ब्रायडल लूकमध्ये ती सुंदररित्या नटलेली दिसत आहे. सौजन्य -WedMeGood9 / 9सात्विकाने अभिनेत्री न होता वेगळ्या क्षेत्रात नाव कमावलं आहे. एमबीएचं शिक्षण घेतल्यानंतर तिने आधी मॉडेलिंगही केलं. तर आता ती वॉर्नर ब्रोस पिक्चर्स या संस्थेत काम करत आहे.