Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोल्ड सीनला माझा कायम नकारच! मराठमोळी अभिनेत्री स्पष्टच बोलली; आता विचारणाच होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:48 IST

1 / 7
आजकाल ओटीटी, वेबसीरिज म्हटलं की त्यात बोल्ड दृश्य हमखास असतातच. या दृश्यांशिवाय कथाच पूर्ण होत नाही असाच मेकर्सचा समज असतो.
2 / 7
याला अपवाद ठरली आहे एक मराठी अभिनेत्री. तिने बोल्ड सीन्स करायला एक नाही तर अनेकदा थेट नकार दिला आहे. त्यामुळे तिला आता वेबसीरिजसाठी विचारणाच होत नाही असं ती म्हणाली आहे.
3 / 7
ही अभिनेत्री आहे शिवानी बावकर. शिवानी 'लागिरं झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिच्या शीतली या भूमिकेने तिला खूप प्रसिद्धी मिळाली.
4 / 7
बोल्ड दृश्यांवर शिवानी नेमकं काय म्हणाली माहितीये? मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, 'मालिकेत एकदा का प्रसिद्धी मिळाली की इतर माध्यमांमध्ये काम करण्याची ऑफर येतच असते. मला वेब सीरिज, चित्रपटांसाठी विचारणा झाली आहे.'
5 / 7
ती पुढे म्हणाली,'पण बऱ्याचदा बोल्ड सीन्स असल्यामुळे मी नकार दिले. मी असे सीन्स करण्यासाठी अजिबातच कंफर्टेबल नाही. त्यामुळे आता मला ऑफर्सच येत नाहीयेत.'
6 / 7
'माझा आक्षेप फक्त बोल्ड सीन्सवर आहे. त्यामुळे जर कधी कुठली साधी भूमिका मिळाली तर मला नक्कीच त्यात काम करायला आवडेल,' असंही ती म्हणाली.
7 / 7
शिवानी बावकर सध्या 'साधी माणसं' मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. तिने याआधी 'कुसूम', 'लवंगी मिरची' या मालिकाही केल्या आहेत.
टॅग्स :शिवानी बावकरमराठी अभिनेतावेबसीरिज