1 / 7'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.2 / 7या मालिकेत शितल पवार अर्थात शितली ही भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवलं.3 / 7या मालिकेनंतर शिवानीने कुसूम या मालिकेतही काम केलं. त्यामुळे सोशल मीडियावर तिची वरचेवर चर्चा रंगत असते.4 / 7शिवानी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून वरचेवर ती चाहत्यांच्या भेटीला येत असते.5 / 7अलिकडेच शिवानीने छानसं फोटोशूट केलं आहे. यातील काही निवड फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले.6 / 7या फोटोमध्ये शिवानी अत्यंत साध्या लूकमध्ये दिसत आहे. मात्र, या लूकमध्येही ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.7 / 7शिवानीच्या या फोटोला विशेष पसंती मिळत आहे.