काळ्या रंगाच्या इंडो-वेस्टर्न साडीत श्रेया बुगडेचं लेटेस्ट फोटोशूट; नेटकरी होतायेत घायाळ By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 5:15 PM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.2 / 8चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आपल्यातील विनोदशैली दाखवून श्रेयाने अल्पावधीत प्रेक्षकांच मन जिंकलं.3 / 8श्रेया कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.4 / 8अलिकडेच श्रेयाने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही मोजके फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.5 / 8श्रेयाने काळ्या रंगाच्या साडीमध्ये छानसं फोटोशूट केलं आहे.6 / 8श्रेयाने साडीला इंडो-वेस्टर्न टच दिल्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.7 / 8नाकात नथ, छानशी हेअर स्टाइल यामुळे श्रेया चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.8 / 8श्रेयाने एका साडीच्या ब्रँडसाठी हे फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications